कडदोरा (ता. उमरगा) : शेतकरी वैजिनाथ बालकुंदे यांनी फुलविलेली झेंडूची शेती.
कडदोरा (ता. उमरगा) : शेतकरी वैजिनाथ बालकुंदे यांनी फुलविलेली झेंडूची शेती.  
मराठवाडा

उस्मानाबाद : झेंडूने फुलविले शेतकऱ्याचे आयुष्य

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) - परतीच्या पावसामुळे झेंडूच्या शेतीचे नुकसान झाले. हाती आलेल्या फुलांतून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. असे असले तरी कडदोरा (ता. उमरगा) येथील शेतकरी वैजिनाथ बालकुंदे यांनी पन्नास हजारांचा नफा मिळविला आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. 


वैजिनाथ बालकुंदे यांनी सहा गुंठ्यांत पिवळा, भगव्या झेंडूची लागवड केली होती. दसरा-दिवाळीत बाजारपेठेत फुलांचा खच होता; मात्र बाजारपेठेऐवजी जागेवरच पाच किलो व त्यापेक्षा जास्त फुले घेणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी प्राधान्य दिले. त्यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून प्रसार केला. त्यामुळे कमी वेळेत व वाजवी दरात फुलांची विक्री करणे शक्‍य झाले, असे ते सांगतात. 


दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन झाले होते. फुले विकण्यासाठी शेतकऱ्यांनी सोलापूरची बाजारपेठ गाठावी लागते. वाढता वाहतूक खर्च आणि मार्केटमध्ये कमी भाव यामुळे शेतकऱ्यांना ही कसरत पेलवत नाही. तरीही नाइलाजास्तव अनेक शेतकऱ्यांना सोलापूरच्या बाजारपेठेत नशीब अजमवावे लागते. वैजिनाथ बालकुंदे यांचे बंधू प्रदीप बालकुंदे यांनी ही कसरत टाळण्याचा प्रयोग केला.

फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर माहिती देऊन अतिशय चांगल्या भावात जागेवरच फुले विकली. त्यातून नफा मिळविला. झेंडूची फुले थेट ग्राहकांना विकल्यामुळे जवळपास 50 हजारांचा नफा झाल्याचे श्री. बालकुंदे यांनी सांगितले. फुले लागवडीसाठी तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी उमेश जाधव यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT