Prakash-Ambedkar 
मराठवाडा

सभा ऐकण्यासाठी 'त्यांनी' लांबवला विवाह सोहळा!

कृष्णा पिंगळे

सोनपेठ - नेते विवाहाला उपस्थित राहणार म्हणून विवाहाची वेळ लांबवल्याच्या घटना अनेकदा पाहावयास मिळतात; परंतु वऱ्हाडाला नेत्याची सभा ऐकायला मिळावी म्हणून विवाह सोहळाच दिवसभर लांबवल्याचे वाघलगाव (ता. सोनपेठ) येथे रविवारी दिसून आले.

वाघलगाव येथील अशोक साळवे यांची मुलगी सीमा हिचा पाथरी तालुक्‍यातील अशोक ढवळे यांचे पुत्र सूरज याच्याशी आज सकाळी अकराला विवाह होता. दुसरीकडे परभणी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची पाथरी येथे सभा होती.

बऱ्याच दिवसांनंतर ऍड. आंबेडकर हे पाथरीत येत असल्याने त्यांची सभा ऐकण्याची इच्छा वऱ्हाडी मंडळींनी वरपिता अशोक ढवळे यांच्याकडे व्यक्त केली. ढवळे यांनी ती मान्य केली व वधुपिता अशोक साळवे यांना फोन करून वऱ्हाड सभेसाठी जाणार असल्याने विवाहास उशीर होणार असल्याची कल्पना दिली. ठरल्याप्रमाणे वरपिता, वरमाता यांच्यासह वऱ्हाडी ऍड. आंबेडकरांच्या सभेसाठी उपस्थित होते. सभा आटोपून दुपारी चारच्या सुमारासार वऱ्हाडी वाघालगाव (ता. सोनपेठ) येथे दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा सूरज व सीमा यांचा मंगल परिणय उत्साहात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: ऑफर लेटर मिळालं… पण नोकरी नाही! टाटांच्या कंपनीमुळे 600 कर्मचारी बेरोजगार; काय आहे प्रकरण?

Agra Conversion Racket : टोळीचा म्होरक्या अब्दुल रहमान शाहीन बागेत करायचा हिंदू मुलींचं ब्रेनवॉश, रोहतकच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

Nashik News : नाशिकच्या बाल निरीक्षणगृहातून पळालेली अल्पवयीन मुलगी जेजुरीतून ताब्यात

मोदी-कलाम यांच्यासोबतचे फोटो, लग्झरी गाड्या; अख्खं दूतावास बनावट, जगाच्या नकाशावर नसलेल्या देशांच्या 'राजदूता'ला अटक

'बऱ्याच मुलींना घरी यायचं असतं पण...' घटस्फोटाबाबत शर्मिष्ठा राऊत स्पष्टच बोलली, म्हणाली...'माझा निर्णय चुकला...'

SCROLL FOR NEXT