file photo 
मराठवाडा

परभणीच्या महापौर, उपमहापौरांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेश व अपत्ती व्यवस्थापण कायदा लागू असताना अभिवादन कार्यक्रम घेतल्याप्रकरणी महापौर, उपमहापौर यांच्यासह अन्य लोकांवर रविवारी (ता.२२) नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरु आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या कार्यक्रम, समारंभ यावर बंदी घातली आहे. त्यामुळे जयंती, उत्सव घरात, मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये साजरे केले जात आहेत.  याच दरम्यान स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.११) महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात अभिवादन करण्यात आले होते. या वेळी महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी नगरसेवक रवींद्र सोनकांबळे, सभापती गुलमीर खान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील जाधव, एन. आय. काळे, अर्जुन काळे, बंडू म्हेत्रे, अर्जुन पुंड, गणपत जाधव, व इतर दोघांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळता एकत्र येऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. म्हणून नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक माधव धंदे यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा ....

ठिकठिकाणी कारवाईत दारू, गुटखा जप्त
परभणी :
पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. ११) पहाटे साडेतीनच्या सुमारास पालमला छापा टाकत देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. तसेच दोन ठिकाणी ८७ हजारांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्यासोबत पाथरी तालुक्यात २०० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.
लॉकडाउन काळात चोरीच्या मार्गाने मद्यविक्री करणाऱ्यांना पकडले जात आहे. शनिवारी (ता. १२) पहाटे पालम येथे छापा टाकत आॅटोरिक्षा पकडण्यात आला. त्यामध्ये विकास मारोती वाघमारे (रा. पालम) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीतील जवळपास दोन लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. मालवाहू वाहनासह एकूण चार लाख ४६ हजार ५७० रुपयांचा माल जप्त झाला आहे. आरोपी विरोधात पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पाथरीत गुटखा पकडला
तर पाथरी तालुक्यातील रेणाखळी व परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागसेननगरात ८७ हजार रुपयांचा गुटखा पकडला. तर लिंबा (ता.पाथरी) शिवारात एका महिलेकडून २०० लिटर गावठी दारूचे रसायन व हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक पांचाळ, फौजदार हनुमंत कच्छवे, जगदीश रेड्डी, घनसावंत, भोरगे, चव्हाण आदींनी केली आहे.

मारहाणप्रकरणी नऊजणांवर गुन्हा
मानवत (जि.परभणी) :
एका सोळावर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पोहंडूळ (ता. मानवत) येथे शनिवारी (ता. ११) घडली. या प्रकरणी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान युनूस शेख (रा. पोहंडूळ) यांने मानवत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, जमावबंदी कायदा लागू असताना गावातील काहीजणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शनिवारी आपणास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नरसिंग धोपटे, सिद्धू धोपटे, गजानन धोपटे, विकास धोपटे, गणेश धोपटे, गुलाब अडसूळ, परसराम नाणेकर, दत्ता धोपटे, ज्ञानराज धोपटे या नऊजणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...

हेही वाचा- परभणीत तापमानाने गाठली चाळीशी
हेही वाचा ...
सेलूत ३८ हजारांचा गुटखा जप्त
सेलू (जि.परभणी) :
रहेमाननगर येथे शनिवारी (ता. ११) रात्री साडेसातच्या सुमारास छापा टाकून एकास गुटखा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी विविध कंपन्यांच्या गुटखा पुड्यासह जवळपास ३७ हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केला.
शहरातील सर्वच भागात संधी मिळेल त्यापद्धतीने गुटखा विक्री होत आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शनिवारी (ता. ११) रात्री साडेसातच्या सुमारास रहेमाननगरमधील रहिवाशी शेख खालेक शेख दादामिया याच्या घरावर छापा टाकला. या वेळी त्यांच्याकडे गोवा गुटखा, पानमसाला आदींसह विविध कंपन्यांचा ३७ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. या वेळी पोलिसांनी मुद्देमालास शेख खालेकला ताब्यात घेऊन त्याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कार्यवाही करण्यात आली. घटनेची माहिती पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड, जमादार संजय साळवे, मोती साळवे, रवी मगरे, अनिल सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
...


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT