Meena Varpudkar is new mayor of Parbhani 
मराठवाडा

परभणीच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर; उपमहापौरपदी सय्यद समी

सकाळवृत्तसेवा
परभणी - महापालिकेच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांची मंगळवारी (ता.16) निवड झाली.
 
परभणी महापालिकेच्या महापौर पदासाठी मंगळवारी (ता.16) सकाळी दहा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती. महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहात झालेल्या सभेत काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार मीनाताई वरपुडकर यांना 40 मते पडली.  तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख आलिया अंजूम यांना केवळ 19 मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे सय्यद समी उर्फ माजूलाला व भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांचे उमेदवारी अर्ज होते. यात उपमहापौर पदासाठी माजू लाला यांना 32 मते मिळाली तर भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ आठ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेतही शिवसेनेचे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariffs 2025: ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लादला कर, आदेशावर स्वाक्षरी... भारतासह ७० देशांवर आजपासून लागू

Crime News: साठीतला चोर सायकली विकून खेळायचा जुगार! महागड्या १९ सायकली जप्त, शाळा महाविद्यालयांच्या पार्किंग, क्लासेस ‘लक्ष्य’

Kharadi Drug Case : खेवलकरच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ, खराडी रेव्ह पार्टी प्रकरण; डेटा पोलिसांच्या हाती, न्यायालयास माहिती

Railway Development: छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्ग होणार दुहेरी; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, विकासाला गती

Santosh Vetal: जवानांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा: पैलवान संतोष वेताळ; नऊ, दहा ऑगस्टला करणार हजार जण रक्तदान

SCROLL FOR NEXT