kalamb
kalamb kalamb
मराठवाडा

उस्मानाबादच्या 'MH 25' च्या युवकांकडून पूरग्रस्तांना मदत

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी कळंब येथील एमएच २५ या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. अतिशय वेळेत तत्परतेने मदत गोळा करून शुक्रवारी (ता.३०) रायगडच्या दिशेने मदतीचा टेम्पो पाठविण्यात आला आहे. (mh 25 sent help to flood affected families in konkan, kolhapur and sangali region)

एमएच २५  हा समूह हा पूर्ण उस्मानाबाद जिल्हयातील युवकांचा आहे. "आम्ही समाजाचं काही तरी देणं लागतो" या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या तरुणांचा हा समुह आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या टीमने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आता सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील आदी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. युकाच्या ग्रुपने पूरग्रस्तांना मदत म्हणून सर्व टीम ने whatsapp व फेसबुक या शोसल मीडियावर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले होते.

समाजातील सर्व स्थरांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत जमा झाली. ही मदत गुरुवारी रायगडच्या दिशेने टेम्पोने पाठविण्यात आली आहे. मदतीने भरलेला टेम्पो पाठविताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाठविण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, ज्ञान प्रसार मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, उपप्राचार्य प्रा.सतिश लोमटे, प्रा.साहेबराव बोंदर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार अॅड शकुंतला फाटक, भीमा हगारे, मनोज शिंदे, शुभम राखुंडे, पृथ्वीराज लोमटे, विपूल देशमुख, संकेत हरवले, मयुर काकडे, आशिष पाटील, वैभव कुलकर्णी, वैभव पारवे, रंजनाताई हासुरे, निलेश पोतदार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

GT vs CSK Live IPL 2024 : चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर तर गुजरात इलिमिनेशन टाळण्यासाठी जोर लावणार

Karnataka Crime: 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न पुढे ढकलल्याने मुलीचं डोकं उडवलं; एक दिवसापूर्वीच झाली होती दहावी पास

SCROLL FOR NEXT