Dr. Bhagwat Karad  sakal
मराठवाडा

Bhagvat Karad: छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड लोकसभा लढवणार? केला मोठा दावा

भागवत कराड यांनी थेट इच्छा व्यक्त केल्यानं शिवसेनेच्या भूमिकेकडं सर्वांच्या नजरा आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

संभाजीनगर : केंद्रीय मंत्री भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर इथून लोकसभेची निवडणूक लढवण्याच इच्छुक आहेत. त्यासाठी शिवसेनेनं इथली जागा भाजपसाठी सोडावी अशी जाहीर मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच यासाठी भाजप सर्वच स्तरावर कामालाही लागला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Minister Bhagvat Karad interested to contest Lok Sabha Election from Chhatrapati Sambhajinagar)

शिवसेनेत फूट पडल्यानं ताकद घटली

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा करताना शिवसेनेत फूट पडल्यानं इथं आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, असा युक्तीवाद भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यावर अद्याप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

शिवसेनेनं भाजपसाठी जागा सोडावी

"संभाजीनगर शहर असेल किंवा ग्रामीण असेल इथली लोकसभेची जागा भाजपनं लढावी अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी भाजपच्या बुथ प्रमुखापासून लोकसभेच्या प्रभारीपर्यंत सर्वजण रात्रंदिवस काम करत आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यामुळं शिवसेनेची ताकद नक्कीच कमी झाली आहे. तर भाजपची संघटनेच्या दृष्टीनं ताकद वाढली आहे. म्हणून भाजपला जागा मिळावी ही सर्वांची इच्छा आहे," असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

संभाजीनगरमधून इच्छुक असल्याचं जाहीर

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथून लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास भागवत कराड इच्छुक आहेत का? या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. "मी देखील या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे", अशा स्पष्ट शब्दांत भागवत कराड यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT