photo 
मराठवाडा

हिंगोलीत बंदला समिश्र प्रतिसाद

राजेश दारव्हेकर

हिंगोली: नागरिकत्व सुधारीत कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी (ता.२४) हिंगोलीत समिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केंद्र शासनाने लागू केलेला ‘सीएए’, ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदची हाक दिली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी (ता.२४) बंद पाळण्यात आला. यानिमित्त दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्‍हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले होते. तसेच बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.

दुपारनंतर व्यवहार सुरळित

 शुक्रवारी सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी गांधी चौकात एकत्र आले. त्यानंतर शहरातून फेरी काढून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले. शहरातील गांधी चौक, सदर बाजार, सराफा बाजार आदी ठिकाणी काही दुकाने सकाळपासून बंद ठेवली होती. त्यानंतर हिंगोली शहरातील बाजारपेठ उघडण्यात आली. दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळित सुरू झाले होते. या वेळी काही दुकाने सोडली तर वाहतूक सकाळपासूनच सुरू होती. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 

गांधी चौकात घोषणाबाजी


दरम्यान गांधी चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्‍हाध्यक्ष वसीम देशमुख, रविंद्र वाढे, ज्‍योतीपाल रणवीर, शेख अतिकुर रहेमान, रतन लोणकर, गणीभाई, बबन भुक्‍तर, योगेश नरवाडे आदींची उपस्‍थिती होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फेरी काढून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

तगडा पोलिस बंदोबस्त


वंचित बहुजन आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आल्यानंतर पोलिस प्रशासनाने बंद दरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासूनच पोलिस कर्मचारी गांधी चौकात ठाण मांडून होते. बंद दरम्यान शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

सेनगाव, औंढा, वसमत येथे दोन तास बंद

केंद्र शासनाने लागू केलेला ‘सीएए’, ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ कायदा रद्द करावा, या मागणीसाठी सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, आखाडा बाळापूर, शिरड शहापूर येथेही बंद पाळण्यात आला. येथील बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यापाऱ्यांनी सकाळी दोन तास दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरवात केली. दुपारनंतर सर्व बाजारपेठ उघडली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT