MLA Dhiraj Deshmukh Photo gets viral on social media
MLA Dhiraj Deshmukh Photo gets viral on social media  
मराठवाडा

'पप्पा, आज तुमची मिठी मिस करतोय'; धीरज देशमुख भावूक

सकाळ डिजिटल टीम

लातूर : लातूर ग्रामीणचे आमदार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित आणि धिरज देशमुख यांची सर्वत्र चर्चा आहे. सख्खे भाऊ आणि तरूण आमदार म्हणून त्यांचा बोलबाला आहे. अशातच काल (ता. 26) धिरजने इन्स्टाग्रामवर एक भावनिक फोटो शेअर केलाय. 

धिरजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या लातूरमधील घरात विलासरावांच्या फोटोसमोर हात पसरून धीरज उभा आहे. त्याच्या पांढऱ्या कपड्यावर मागे गुलालाने भरलेला हाताचा पंजा आहे. या फोटोला 'आज जर मी सर्वांत जास्त काय मिस करत असेल, तर ते म्हणजे तुमची मिठी. पण मला मिळालेल्या प्रत्येक मतात तुमचा आशीर्वाद आहे पप्पा. मी माझ्या जनतेची मनोभावे सेवा करेन.' असे कॅप्शन दिले आहे.

हा फोटो कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. या भावनिक फोटोमुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आलेत, तर अनेकांना विलासरावांची आठवण आली.  

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत धिरज आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ अमित या दोघांनाही भरघोस मते मिळाली. विलासरावांची पुण्याई आणि या भावंडांचे काम बघून लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिले आहे. त्यांच्या प्रचारात त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया देशमुखही सहभागी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT