hadgao.jpg
hadgao.jpg 
मराठवाडा

आजी आमदारांची माजी आमदार पुत्राच्या ‘बुलेट’वरून सवारी

गजानन पाटील


हदगाव, (जि. नांदेड) ः हिमायतनगर मतदारसंघात आष्टीकर-जवळगावकर घराण्याचे राजकीय वितुष्ट मागील कित्येक काळापासून असतानादेखील बुधवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीत आमदार जवळगावकर यांनी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या बुलेटवरून ‘सवारी’ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी जवळगावकरांनी राजकारण बाजूला सारीत शिवजयंतीनिमित्त सामाजिक सलोखा जपल्याने अनेकांनी ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’ याचा प्रत्यय बोलून दाखवीत या बाबीचे कौतुक करीत स्वागतही केले. यानिमित्ताने मतदारसंघातही महाविकास आघाडीचा प्रत्यय यानिमित्ताने दिसून आला असल्याचे अनेकांनी बोलूनही दाखविले.


संपूर्ण मराठवाड्यात परिचित असलेले जवळगावकर आणि आष्टीकर हे दिग्गज घराणे. माजी आमदार निवृत्तीराव पाटील जवळगावकर आणि माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढविली तेंव्हापासून या दोन्ही घराण्यात राजकीय वितुष्ट आहेत. या दोन्ही घराण्यांचे सोयरसंबंध असतानादेखील राजकीय पटलावरील वितुष्टांमुळे कधीच आपापसात जमले नाही.

हेही वाचा - ​ फेरवाणी मित्रमंडळ देणार श्रुतीला दोन कृत्रिम हात
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत माधवराव पाटील जवळगावकर यांनी मराठवाड्यातून दुसऱ्या क्रमाकांचे मताधिक्य घेत भरघोस मतांनी विजय मिळविला. या वेळी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी काँग्रेसने नाकारल्याने त्यांनी जवळगावकर यांच्या उमेदवारीला विरोध करीत थेट शिवसेनेत प्रवेश करून सेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. तद्‍नंतर २०१४ च्या निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांनी सेनेच्या उमेदवारीकडून माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव केला. आणि नुकत्याच पार पडलेल्या २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा माधवराव पाटील जवळगावकर यांनी नागेश पाटील आष्टीकर यांचा पराभव करीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात घेण्यात यश मिळविले. एकंदरीत हे दोन्ही घराणे मागील कित्येक काळापासून एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. परंतु, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण व विकासाच्या ठिकाणी विकास हे या दोन्ही घराण्यांचे वैशिष्ट्य.

सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
राजकारणात जवळगावकरांनी आष्टीकर व आष्टीकरांनी जवळगावकर घराण्याचा राजकारणात आतापर्यंत ‘हिशोब’ चुकता केलेला आहेच. परंतु, शिवजयंतीनिमित्त पार पडलेल्या दुचाकी फेरीत जवळगावकरांनी राजकारण बाजूला सारत सामाजिक सलोखा जपत माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या बुलेटवरून सवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु, अनेकांना आश्चर्याचा धक्काही दिला. हे दृष्य बघितल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने आता हदगाव मतदारसंघातही यापुढे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मिळून मिसळून लढविल्या जातील आणि जवळगावकर व आष्टीकर घराण्यातील राजकीय विरोध यानिमित्ताने थांबेल, असे मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

SCROLL FOR NEXT