Nitin Gadkari Sakal
मराठवाडा

मल्टिमॉडेल लॉजिस्टिक मराठवाड्यासाठी महत्त्वाचा; नितीन गडकरी

गडकरी यांचा विश्‍वास : करारावर स्वाक्षरी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठी जालना येथे होणारा मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क अत्यंत महत्वाचा ठरेल असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत आज महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गडकरी यांच्या निवासस्थानी करार झाला. यावेळी जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह, अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थितीत होते.

हा प्रकल्प मराठवाड्यासह

आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढवणारा ठरेल. या प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि जलमार्गाच्या माध्यमातून शेती व उद्योजकांच्या मालाची सुकर व गतीने निर्यात होण्यास मदत होईल,असे गडकरी यांनी सांगितले.

४५० कोटींचा मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क

भारतमाला योजनेंतर्गत देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित केले जात आहेत. यामध्ये जालन्याचा समावेश करण्यात आला असून या प्रकल्पाची किंमत ४५० कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबाद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हे याशिवाय बुलढाणा भागातील व्यापार उद्योगातील मालाची वाहतूक अतिशय वेगवान आणि अत्यंत कमी खर्चात होईल. औद्योगिक वसाहतीतील सर्व परिसर जोडण्यासाठी जालना महत्त्वपूर्ण केंद्र निर्माण होत असून, यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते, रेल्वे मार्ग, दळणवळण, गोदामे, उद्योगातील कच्चा, पक्का माल साठा करून ठेवण्यासाठी मोठी स्टोअर्स गोदामे, कस्टम क्लिअरन्सची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आजचा हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT