हिंगोली रेल्वे बातमी  
मराठवाडा

मुंबई- जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत न्यावी- खासदार हेमंत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच भागातील रेल्वे सेवा बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राजेश दार्वेकर

हिंगोली : दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला- पूर्णा- हिंगोली मार्गावरुन मुंबई जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी उपलब्ध नसल्यामुळे सध्या जालना ते मुंबई दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे संसदीय समितीच्या बैठकी दरम्यान रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांच्याकडे केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच भागातील रेल्वे सेवा बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्हा हा दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो या भागातील नागरिक शासकीय आणि मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबई, औरंगाबाद ये- जा करत असतात. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला- हिंगोली- पूर्ण रेल्वे मार्गावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडे जाणारी एकही रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे हिंगोली, वसमत आणि वाशिम येथील प्रवासी नागरिकांची कित्येक वर्षांपासून मोठी गैरसोय होत आहे. पण आता यावर लवकर तोडगा काढून मुंबई- जालना जनशताब्दी ही रेल्वेगाडी हिंगोली किंवा वाशीम पर्यंत चालवण्यास लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्याकडे केली.

हेही वाचा - आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या राज्यातील बॅंकांमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकल्या आहेत.

ही रेल्वेगाडी १२ तास जालना येथे उभी असते, तो वेळ वापरुन गाडी पुढे चालवावी असे तंत्रशुद्ध कारण खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे समितीला पटवून दिले. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेकडून कार्यवाही होऊन ही मागणी पूर्ण होईल आणि हिंगोली वासियांना मुंबईकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. अकोला- पूर्णा- हिंगोली- वसमत मार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रेल्वे विभागाशी अनेक वेळा मागणी करुनही कारवाई होत नसल्याचे खासदार पाटील म्हणाले. सध्या नांदेडवरुन मुंबई करिता रेल्वे सुरु आहेत, पण हिंगोली जिल्ह्याच्या भागातून रेल्वे सेवा सुरु नाहीत.

येथे क्लिक करा - नक्की कुठे काय अन् कसं घडलं... सारं काही केलं स्पष्ट

त्यामुळेच सध्या जनशताब्दी एक्सप्रेस जालना ते मुंबई दरम्यान दररोज धावते. ही रेल्वेगाडी सकाळी आठ वाजता मुंबई करिता निघते आणि रात्री पावणे आठच्या सुमारास जालन्यात येऊन १२ तास थांबते. त्यामुळे त्या गाडीला जालन्याऐवजी हिंगोली किंवा वाशिमपर्यंत वाढविण्यात आल्यास या भागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाना सोयीचे ठरणार आहे. तसेच यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल या सर्व बाबी लक्षात घेता यावर विचार करण्यात यावा. या बैठकीत खासदार पाटील यांनी देशातील महत्वाचे रेल्वे प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेत वेअर हाऊस बांधण्यात यावे आदी प्रश्न मांडले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT