file photo 
मराठवाडा

मुंबईने वाढवला ताप, हिंगोलीत आज पुन्हा आठ पाॅझिटिव्ह

राजेश दारव्हेकर

हिंगोली : मुंबई, रायगड, पुणे येथून गावी परतलेल्या आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल रविवारी रात्री उशिराने प्राप्त झाला आहे. यामुळे गाफील राहिलेल्या कळमनुरी तालुक्यात आता कोरोना रुग्णांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १५९ वर पोहचली आहे. 

रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मुंबई चार, रायगड तीन आणि पुणे एक असे मिळून आठ व्यक्ती कन्टेन्ट झोन मधून आपल्या मूळ गावी परतल्याने त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. आतापर्यन्त हिंगोली, सेनगाव, वसमत ,औंढा या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. मात्र एकमेव कळमनुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. 

कळमनुरीमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नसल्याचे पाहून आम्ही अलर्ट असल्याचे भासवून गाफील राहिलेल्या प्रशासनाला अखेर कोरोना रुग्णांचा सामना करावा लागत आहे. या बाहेर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांना कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू केले आहेत. आता जिल्ह्यात १५९ रुग्ण झाले असून त्यापैकी ९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला ६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरच रुग्ण संख्या कमी होईल, अन्यथा पुन्हा वाढण्याची दाट श्यक्यता आहे.

काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत
जिल्ह्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्‍याचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असल्याचे जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. कंटेनमेंट झोनमध्ये हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर, जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.

तर होणार दंडात्मक कारवाई
कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द  साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

Pratik Shinde Car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रिल स्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर क्रेटाला धडकली, तीन गाड्यांचे लाखोंचे नुकसान

Maharashtra Rain : मान्सून जाता जाता झोडपणार, महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता; येत्या २-३ दिवसात कसं असेल वातावरण?

Bachchu Kadu: बोगस कृषी औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या : बच्चू कडू, देवळीत दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

SCROLL FOR NEXT