Accident News Esakal
मराठवाडा

Accident News: मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी

मुंबईहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मुंबईहून बीडच्या दिशेने जात असताना अष्टा हरिनारायण येथे पहाटेच्या सुमारास वळण घेत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बस 150 फूट घसरत गेली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी आणि जामखेड येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण; डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू

बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे एका भरधाव अॅम्बुलन्सने ट्रकला मागच्या बाजून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात अॅम्बुलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (35 वर्ष), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35 वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT