Balaji-Telange
Balaji-Telange 
मराठवाडा

मित्राचे भांडण सोडविणे बेतले तरुणाच्या जिवावर

सकाळवृत्तसेवा

मुदखेड - गल्लीतील दोन मित्रांतील भांडण सोडविणे एकाच्या जिवावर बेतल्याची घटना मंगळवारी (ता. पाच) रात्री मुदखेड येथे घडली. भांडण सोडविण्यास गेलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुदखेडच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी बालाजी रामजी तेलंगे व केशव नारायण तेलंगे हे मित्र काही कारणावरून आपापसांत भांडण करीत एकमेकांना मारून घेत होते. हा प्रकार त्यांचा मित्र बालाजी देवराव तेलंगे (वय २२, रा. कुंभार गल्ली) याच्या निर्दशनास आला. भांडण सोडविण्यास त्याने मध्यस्थी केली. ‘आमच्या भांडणात तू कशाला आलास, तुला काय करायचे’ असे म्हणून एकाने बालाजी देवराव तेलंगे यांच्या गुप्तांगावर जोराची लाथ मारली. त्यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाइकांसह नागरिकांनी त्यास मुदखेड ग्रामीण रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुदखेड पोलिसांत दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. संशयित बालाजी रामजी तेलंगे व केशव नारायण तेलंगे यांना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT