संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

जुन्या वादातून तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा

गेवराई (जि. बीड) - जुन्या वादातून पारधी समाजातील एका वीसवर्षीय तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तरुण जागीच ठार झाला असून, घटनेनंतर आरोपी फरारी झाले आहेत. संजय काकासाहेब चव्हाण (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गेवराई तालुक्‍यातील नागझरी येथे शनिवारी (ता. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी येथे याच पारधी समाजातील दोन गटात तलवारबाजी होऊन एकाची हत्या झाली होती. 

गेवराई तालुक्‍यातील नागझरी हे धुळे-सोलापूर महामार्गावरील गाव आहे. शनिवारी दुपारी वस्तीवर राहणारा संजय चव्हाण हा घरासमोरील रस्त्यावर थांबला असता याच काही जणांनी त्याच्यावर जुन्या भांडणातून धारदार शस्त्राने हल्ला चढवला. संजयच्या छातीत धारदार शस्त्राचे खोलवर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजयला पोलिस व्हॅननेच येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथील डॉक्‍टरांनी गंभीर जखमी संजयवर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफर केले.

जिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्‍टरांनी संजयला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर महिलांसह पुरुषांनी रुग्णालयात गर्दी केली. मृताच्या नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

नागझरी पुन्हा हादरली 
पाच महिन्यांपूर्वी चार एप्रिल 2019 रोजी येथे दोन गट जुन्या वादातून भिडले होते. त्यावेळी झालेल्या तलवारबाजीत उत्तरेश्वर भारत पवार (वय 20) हा तरुण जागीच ठार, तर त्याचा मोठा भाऊ नारायण भारत पवार (26) हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, याच घटनेचा राग धरून शनिवारी संजयवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जाते. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, मनोजकुमार लोंढे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Nagaradhyaksha Results 2025 : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष? वाचा संपूर्ण यादी

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

Latest Marathi News Live Update: भारतीय अन्न महामंडळाची पहिली मालवाहू धान्य रेल्वे आज काश्मीरमध्ये पोहोचली

SCROLL FOR NEXT