जालना : येथील नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्‍घाटन करताना माजी राज्यमंत्री तथा बाजार समिती सभापती अर्जुन खोतकर व इतर 
मराठवाडा

तुरीपाठोपाठ हरभरा खरेदीला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  तूर खरेदीपाठोपाठ आता नाफेडने चार हजार ८७५ रुपये हमीभावाने हरभरा खरेदीची तयारी केली आहे.  जालना येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्र येथे गुरुवारी (ता.१६) हरभरा खरेदीची सुरवात करण्यात आली आहे. तर भोकरदन येथे यापूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली आहे. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. याच ठिकाणी गुरुवारी (ता.१६) हरभरा खरेदी केंद्राचे माजी राज्यमंत्री तथा बाजार समिती सभापती अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बाजार समिती सचिव रजनीकांत इंगळे, पंडित भुतेकर, अंकुश परकाळ, सूर्यकांत कदम, सचिन गोल्डे आदींची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात नाफेडने सहा हरभरा ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू केले आहेत. या सहा नोंदणी केंद्रांवर ता.१५ एप्रिलपर्यंत तीन हजार ८९३ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक जालना येथील हरभरा नोंदणी केंद्रावर दोन हजार ६५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता गुरुवारी (ता.१६) जालना येथील केंद्रात खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. 

भोकरदनमध्ये खरेदी 

नाफेडच्या भोकरदन येथील हरभरा खरेदी केंद्रावर ता. १५ एप्रिलपर्यंत ८२५ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून ता. १५ एप्रिलपर्यंत १९० शेतकऱ्यांकडून एक हजार ७९४.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT