naktoda.jpg
naktoda.jpg 
मराठवाडा

नाकतोडा खातोय ऊस ! वाचा काय आहे हा प्रकार  

हरी तुगावकर

लातूर : लातूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस पीक चांगले जोमात असताना त्यावर आत नाकतोडा किडीचा प्रादूर्भाव होत आहे. नाकतोडा ऊसाचे पानेच खात असल्याने त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱयांनी वेळीच काळजी घ्यावी तसेच उपाय योजना कराव्यात असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

लातूर तालुक्यात मांजरा नदीच्या पट्ट्यात ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. सध्या ऊस पिक चांगले आलेली आहे. पण गेल्या काही दिवसापासून नाकतोड्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. हे नाकतोडे ऊसाचे पाने खावून टाकत आहेत. त्याचा परिणाम ऊस पिकावर होत आहे. ही किड नाही रोखली तर ऊस उत्पादक शेतकऱय़ांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दरम्यान साई (ता. लातूर) येतील दगडूसाहेब प्रकाश पवार यांच्या नाकतोडा किडग्रस्त ऊस पिकाची पाहणी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांनी केली आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाणे, उप-विभागीय कृषि अधिकारी, आर. एस. कदम, उप-विभागीय कृषि अधिकारी महेश तीर्थकर, मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. श्री. संदीप देशमुख, तालुका कृषि अधिकारी महेश क्षिरसागर, विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी राजेंद्र जाधव, मंडळ कृषि अधिकारी एस. एस. बावगे, ऊस विकास अधिकारी श्री. पवार,  कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पवार,  कृषि पर्यवेक्षक पी. एच. रेड्डी, कृषि सहाय्यक श्रीमती पल्लवी बायस व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

अशा करा उपाय योजना

नाकतोड्यावर उपाय योजना करण्यासाठी पुढील प्रमाणे सल्ला देण्यात आला आहे. यात लॅम्बडा सायहलोथ्रीन ५ टक्के ईसी एक मिली किंवा क्लोरोपायारीफोस ५० टक्के ईसी दोन मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ईसी एक मिली किंवा डायफ्लूबेन्झुरान २५ टक्के डब्लूपी ०.५ मिली किंवा  फेनव्हलरेट एक मिली  या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति एक लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी व पेट्रोल पंप असेल तर मात्र दुप्पट करावी. त्याच बरोबर ज्या ऊसात फवारणी शक्य नसल्यास सऱ्यामध्ये किंवा बांधाच्या कडेनी डीडीव्हीपी ७६ टक्के- नुवान @ ५०० मिली / एकर किंवा  डेल्टामेथ्रीन ११ टक्के  इसी- डेसिस @ २५० मिली / एकर १०० किलो कोरड्या वाळूत किंवा मातीत मिसळून सरीतून उभ्या पीकामध्ये वापरावे. त्याच बरोबर कीटकनाशके वापरल्यानंतर हिरवा चारा व चरणे येथील गवत जनावरांना ८ ते ९ दिवस कापून खाण्यासाठी घालू नये असे आवाहनही शास्त्रज्ञ व अधिकाऱयांनी केले आहे.

ऊसावरील हा प्रादूर्भाव टोळधाड कीडीचा नाही. हाइरोग्लिफस निग्रोरेप्लटस या नाकतोडा प्रजातीतील किडीचा आहे. सर्वसाधारण साळ पिकावर आढळून येणारी ही कीड आहे. सामान्यतः टोळधाड ही वाटेत येईल त्या सर्व पिकावर नुकसान करते व नाकतोडा ही कीड फक्त गवत वर्गीय पिके जसे साळ, ऊस, ज्वारी, मक्का, बाजरा, चारा गवत इत्यादी वर प्रादूर्भाव करते. बहुतांशवेळी या किडीचा सोयाबीन, कापूस पिकाना धोका आढळून येत नाही. अशा नाकतोडा वर्गीय किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यानंतर नियंत्रणासाठी रासायनिक उपाय करणे गरजेचे असते.
प्रा. संदीप देशमुख, किटकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र.
 

Edit- Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT