Sakal 
मराठवाडा

उमाकांत मिटकर यांचे दातृत्व; पुरस्कारांची रक्कम एकल महिलांच्या कार्यासाठी

भगवंत सुरवसे

नळदुर्ग (उस्मानाबाद): पुणे येथील नातू फौंडेशनचा ‘सुलोचना नातू सेवाव्रती’ पुरस्कार उमाकांत मिटकर यांना शनिवारी ( ता.नऊ ) रोजी देण्यात आला. या पुरस्काराची मिळालेली २५ हजार रूपये रक्कम त्यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल महिलांच्या कामासाठी देत सामाजिक उत्तरदायीत्व निभावले आहे. विशेष बाब म्हणजे उमाकांत मिटकर यांना आतापर्यंत ४३ पुरस्कारातून मिळालेल्या ९ लाख ५७ हजार रूपयाची रक्कम  विविध संस्थेला दान दिली आहे.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नातू फाऊंडेशनचा हा पुरस्कार दिला जातो. उमाकांत मिटकर यांनी भटके विमुक्त समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सेनापती बापट रोड वरील नातू सभाग्रहात हा  कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर नातु फाऊंडेशनचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी, विवेक गिरधारी, श्रीमती अभया टिळक, ऋषीकेश गोडसे उपस्थीत होते. औरंगाबाद येथील डॅा.दिवाकर कुलकर्णी यांना महादेव बळवंत नातू पुरस्काराने गौरविण्यात आले.

तुळजापूर आणि परिसरात वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ७८ विधवा, परित्यक्ता, बेघर, अनाथ महिलांसाठी सेवाकार्य चालवले जाते, या महिलांच्या स्वावलंबनासाठी सदरील पुरस्कारात मिळालेली रक्कम उमाकांत मिटकर यांनी संस्थेच्या मार्गदर्शीका अनिता जाधवर यांच्याकडे अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सुपूर्त केली.

उमाकांत मिटकर यांनी युनोस्कोचा इनोव्हेशन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा श्री पुरस्कार यासह ४३ पुरस्काराची रक्कम विविध सामाजिक संस्थांना दान केली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT