Nanded Accident 5 people killed and 6 seriously injured in a horrific accident in Nanded mudkhed road  esakal
मराठवाडा

Nanded Accident News : कामावर निघालेल्या मजूरांनी भरलेल्या रिक्षाला ट्रकनं उडवलं! ५ जण ठार, ६ गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात अपगातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एक लहान मुल आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आज (३० मार्च) सकाळी नांदेड ते मुदखेड या मार्गावर १५ जणांना घेऊन जाणाऱ्या मजूरांच्या ऑटो रिक्षाला ट्रकने उडवले. नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्‍या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली.

या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्‍य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालल्या माहितीनुसार ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT