फोटो 
मराठवाडा

नांदेड बनले दुचाकी चोरींचा अड्डा, पुन्हा १५ दुचाकी जप्त 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे. मागील पंधरा दिवसात दोन मोठ्या कारवायानंतर पुन्हा तिसरी कारवाई करुन तीन चोरट्यांकडून १५ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी रविवारी (ता. १६) मुखेड तालुक्यातील जांब परिसरात केली. 

दुचाकी व मोबाईल चोरांनी पोलिसांची झोप उडवून दिली आहे. हे चोरटे नांदेड शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून दुचाकी चोरत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे वाहनधारक भयभीत झाले असल्याने शहरात वाहन कुठे लावावे या तणावात वाहनधाक वावरत आहेत. अनेक घटना तर अंगणात किंवा दुकानासमोर लावलेल्या दुचाकी चोरील्या गेल्या आहेत. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मागील पंधर दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळत आहेत. तीन कारवायामध्ये जवळपास ७० हुन अधीक चोरीला गेलेल्या दुचाकी जप्त केल्या असून काही अट्टल चोरटे जेरबंद केले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांनी सर्वच ठाणेदारांना सक्त सुचना दिल्या आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सर्वच अधिकाऱ्यांना सुचना देऊन दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणून जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज केले आहे. यावरून फौजदार गोविंद केंद्रे यांनी आपले सहकारी भानुदास वडजे, मारोती तेलंग, गणेश धुमाळ, दशरथ जांभळीकर, तानाजी येळगे, बालाजी तेलंग यांना सोबत घेऊन मुखेड तालुक्यात गस्त घातली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुखेड शहरातील वेताळगल्ली परिसरातून गंगोजी साईनाथ मंगनाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यावरून प्रदीप उमाटे व एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन तिघांची कसुन चौकशी केली. यावेळी हे गंगोजी मंगनाळे हा ह्या दोघांना गाडीच्या किल्ल्या व पैसे पुरवत असे. या तिघेजन जांब (ता. मुखेड) येथील एका दुचाकी मेकानिकच्या शेतातून पोलिसांनी सहा लाखाच्या पंधरा विविध कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या. 

दोन चोरट्यांना पोलिस कोठडी

हे चोरटे लातूर, नायगाव, मुखेड व नांदेड शहरातून दिचाकी चोरत असलून या शेतात ठेवून तेथून ते काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती पोलिसांंनी सांगितली. यातील गंगोजी मंगनाळे व प्रदीप उमाटे याला सात दुचाकीसह नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. तर विधीसंघर्ष बालक आणि आठ दुचाकी रामतिर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले. यातील दोन चोरट्यांनी न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. या चोरट्यांकडून अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: रचिन रवींद्रला DRS अभावी जीवदान, पण अखेर OUT! डॅरिल मिचेलचाही जैस्वालने घेतला भारी कॅच; लंचपर्यंत भारताचं वर्चस्व

MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

Maharashtra Wage Rules: सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे? महाराष्ट्रातील नव्या वेतन नियमांत काय?

IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

Motherhood and Career: आई झाल्यानंतर पुन्हा ऑफिसला जाताय? कामावर परतताना महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT