file photo
file photo 
मराठवाडा

नांदेडचे नगरसेवक देणार एक महिन्याचे मानधन

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे निधी संकलन करण्यात येत असून नांदेड वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक त्यांचे एक महिन्याचे मानधन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे देणार आहेत.

जगभरात अनेक देशात कोरोनाने धुमाकुळ घातला असून अनेक ठिकाणी अर्थव्यवस्थेला धोका पोहचला आहे. अशातच आता मंदीचे सावट आहे. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी उद्योजक, विविध संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधीसह इतरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

हे ही वाचा - विवाहाच्या सर्व मुहूर्तांवर सोडावे लागणार पाणी !


एक महिन्याचे मानधन देणार
नांदेड महापालिकेतील कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक हे देखील त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. नांदेड वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता असून ८१ पैकी ७३ नगरसेवक हे कॉँग्रेस पक्षाचे आहेत. महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला आणि एक महिन्याचे मानधन देण्याचे ठरले.

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे स्वतः नांदेडमध्ये थांबून माहिती घेत आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत. पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेतील कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - ‘देवदूता’च्या दारातून रुग्णावर परतण्याची वेळ

महापालिकेकडून अनेकांना मदत
दरम्यान, महापालिकेच्या वतीने कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांना घरबसल्या किराणा, भाजीपाला, दूध मिळावे, यासाठी नियोजन करण्यात आले असून त्या त्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयातंर्गत किराणा दुकानदार आणि भाजीपाला व फळ विक्रेत्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक देण्यात आले आहे. त्यांना संपर्क करून आपण घरबसल्या किराणा सामान, भाजीपाला, फळे आणि दूध मागवू शकतो. महापालिकेच्या वेबसाईटवर या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्त्यावर देखील औषधाची फवारणी करण्यात येत आहे.

मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कोरोनाचे संकट जगावर आले असून त्यातून सावरण्यासाठी आर्थिक मदत म्हणून नांदेड वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्फत हे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा करण्यात येणार आहे.
- विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते, नांदेड वाघाळा महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT