Nanded Photo 
मराठवाडा

आतापर्यंतच्या झालेल्या चाचणीत नांदेड जिल्हा ‘कोरोना’मुक्त

शिवचरण वावळे

नांदेड : दिवसेंदिवस ‘कोरोना’चा प्रसार वाढत आहे. मराठवाड्यात रोज नव्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद होत असताना नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता.दोन) एप्रिलपर्यंत एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आला नाही. यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.  

मार्च महिण्यात दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ‘तबलिगी’ जमात या धार्मिक कार्यक्रमाहून नांदेड शहरात परत आलेल्या व्यक्तींमुळे नांदेड वासियांची धाकधुक वाढली होती. परंतु, बुधवारी (ता.एक) एप्रिल रोजी पाठविलेल्या ११ आणि त्यापूर्वी पाठविलेल्या १२ अशा एकुण २३ संशयितांचा (स्वॅब) नमुण्याचा अहवाल गुरुवारी (ता.दोन) निगेटीव्ह प्राप्त झाला आहे. हजरत निजामुद्दीन ‘तबलिगी’ जमात या धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या त्या ११ जणांपैकी एकाही संशयित व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे आढळून आली नसल्याचा पहिला अहवाल प्राप्त झाल्याने नांदेडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

३४१ व्यक्ती होम कॉरन्टाईन मध्ये  
आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातील ३८६ संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. यातील ३४१ व्यक्तीस होम कॉरन्टाईन मध्ये ठेवण्यात आले आहे तर ३४ संशयितांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. यातील ११ व्यक्तींचा २८ दिवसांचा क्वॉरंटाईन पिरियड संपल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

२७ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी 
जिल्ह्यातील ३८६ पैकी ९७ संशयितांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील ६५ व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर २७ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. तर ७८ व्यक्तींना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. गुरूवारी (ता.दोन) पुन्हा १२ व्यक्तींचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शुक्रवारी (ता.तीन) पर्यंत प्राप्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT