Donate.jpg
Donate.jpg 
मराठवाडा

नांदेडमध्ये दात्यांनी दिला ‘एवढ्या’ लाखांची निधी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आपले योगदान राहावे यासाठी जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती, संस्था पुढे आल्या आहेत. अन्नधान्यांसह जेवन, आरोग्य उपकरणे उपलब्ध करुन देण्यासोबतच जिल्ह्यात आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच पंतप्रधान केअर निधीत साडेचौदा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे दिल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

नागरिकांना सुविधेसाठी निधीची गरज 
सध्या देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे शासनाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची गरज लागत आहे. या सोबतच या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने अन्नधान्य तसेच जीवनावश्‍यक वस्तूचा पुरवठा करण्यात येत आहे. 

अनेक दाते आले पुढे
संकटकाळी आपला वाटा असावा या उद्देशाने अनेकांनी अनेक रोख रक्कम मदत म्हणुन जाहीर केली आहे. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सेवाभावी संस्था, बचत गट तसेच दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच पंतप्रधान केअर निधीमध्ये दान दिले आहे. यात अनेक दानशूर व्यक्तींनी जेवण देण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार अनेकांनी एका कुटुंबाला एक महिना पुरेल एवढे धान्याचे किट उपलब्ध करून दिले आहे. हे किट सध्या गरजू लोकांना वाटप करण्यात येत आहे. 

महापालिकेकडून आठ लाखांचा निधी
नांदेड वाघाळा शहर महापालिकेकडून आठ लाख १६ हजार ६६६ रुपये, ओमकार कन्स्ट्रक्शन एक लाख अकरा हजार, रामदास गिरजप्पा होटकर यांच्याकडून ३३ हजार ८७७,  सुखी सदस्य निधी बचत गट, वसंननगर नांदेड एक लाख,  आनंदी मित्र परिवार पुरुष बचत गट एक लाख, डॉ. व्यंकटेश काब्दे पाच हजार, सविता सूर्यकांत औसेकर पाच हजार, डॉ. व्यंकटेश काब्दे पाच हजार, डॉ. आदिती काब्दे पाच हजार, डॉ. कुजंम्मा काब्दे पाच हजार, डॉ. अजित व्यंकटेश काब्दे पाच हजार, सुरेश काब्दे पाच हजार, सुनील काब्दे पाच हजार, श्रीमती मंगल काब्दे पाच हजार, भानूदेव काब्दे पाच हजार

अनेकांचे हात आले पुढे 
नंदकिशोर उपरे पाच हजार, राजेंद्र उत्तम भागवत (पुसद, जि. यवतमाळ) पाच हजार, डॉ. अंनत भोगावकर पाच हजार, मारुती देगलूरकर पाच हजार, डॉ. पुष्पा कोकीळ पाच हजार, सविता कलेटवाड पाच हजार, डॉ. यु. डी. गवइ पाच हजार, डॉ. बालाजी कोंबाळकर पाच हजार, डॉ. लक्ष्मण शिंदे सात हजार, ए. आर. इनामदार पाच हजार, राजेंद्र शुक्ला पाच हजार, डॉ. एम. पी. शिंदे २१ हजार शंभर, बालाजी मुंजाजी टिमकीकर दोन हजार, डॉ. अशोक नरसिंगराव सिद्धेवाड पाच हजार,  गुरुदेव पुरुष बचत गट जवळगाव, ता. हिमायतनगर दहा हजार, गुरुदेव पुरुष बचत गट जवळगाव, ता. हिमायतनगर दोन हजार ५५१, गुरुदेव बचत गट जवळगाव, ता. हिमायतनगर २१ हजार, नांदेड जिल्हा फळे भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था नांदेड ५१ हजार रुपये. या प्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीस १३ लाख ८१ हजार१९४ रुपये निधी दिला आहे.

पंतप्रधान केअर निधीतही आले दान
त्यासोबतच पंतप्रधान केअर निधीत काही रक्कम जमा झाली आहे. यात गुरुदेव बचत गट जवळगाव ता. हिमायतनगर दोन हजार ५५१, विवेक वसंतराव मोगडपल्ली ५१ हजार रुपये असे पंतप्रधान केअर निधीत ५३ हजार ५५१ रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केअर निधीमध्ये जिल्ह्यात एकूण १४ लाख ३४ हजार ७४५ रुपये जमा झाले आहेत. या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT