Home sakal
मराठवाडा

नांदेड : महागाईमुळे घराचे स्वप्न भंगले

वाढत्या महागाईचा फटका; बांधकाम क्षेत्रही मंदावले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांतील आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेक उद्योगधंदे, व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. दीड वर्षानंतर त्यातून अद्याप आर्थिक गाडी रुळावर आलेली नाही. तसेच बांधकाम क्षेत्रात लोखंडी सळई, सिमेंटच्या किंमतीत वाढ झाल्याने अनेक सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगले आहे. महागाईच्या वरवंट्याखाली घर बांधकाम साहित्यही महागल्याने सद्यस्थितीत सर्वसामान्यांचे बजेट आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रही मंदावले असून त्याचा परिणाम थेट या क्षेत्रातील व्यावसायीक, ठेकेदार, मजूर, कामगारांवर झाला आहे.

लोखंडी सळई, सिमेंट यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने बांधकाम बजेट कोलमडले आहे. बांधकाम व्यावसायिक व बांधकाम करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्राला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाईपमध्ये वापरात येणारे प्लास्टिक रेसिन्स, इक्स्युलेशन सामान यांच्याही किंमती मागील काही महिन्यांत भरमसाट वाढल्या आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांकडील पुरवठ्यातील तूट हे सर्व बाजारांतील विकासकांसाठी आव्हान ठरले आहे.

या कच्च्या मालाच्या संकटामुळे महामारीच्या पहिल्या लाटेने याखेरीज तांबे व अॅल्युमिनियमच्या किंमतीतील वाढीचाही बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्र दुसरी लाट व लाॅकडाउन निर्बंधांचा सामना करीत असतानाच कच्च्या मालाच्या किंमतीतील या वाढीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या महसुलाला ब्रेक लागला आहे.

बांधकाम क्षेत्राला घरघर अनेक प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. परराज्यांतील कामगार स्वगृही परतले आहेत. पुन्हा कामावर येण्यासाठी मजुरी वाढवूनही काही परप्रांतीय परत येत नाहीत. त्यामुळे मजुरांचा तुटवडा भासत आहे. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांना व त्यांच्या हाताखाली रोज मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य मजुरदार वर्गाला बसल्याने त्यांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक गाडी रुळावर यायला दोन ते तीन वर्षे जातील. दोन वर्षांपासून कोरोना संकट घोंगाऊ लागल्याने बांधकाम क्षेत्राला दृष्ट लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरातील सागवान तस्करांना राजकीय राजाश्रय मिळतो का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT