nanded sanjay biyani murder case resolved by nanded police 6-people arrested by police
nanded sanjay biyani murder case resolved by nanded police 6-people arrested by police  
मराठवाडा

व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरण अखेर उलगडले, सहा जणांना अटक

अभय कुळकजाईकर

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. याबाबतची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बुधवारी (ता.१) पत्रकार परिषदेत दिली. (nanded sanjay biyani murder case resolved by nanded police 6-people arrested by police)

पाच एप्रिल रोजी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात विमानतळ पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशान्वये एसटीआयची स्थापना करण्यात आली होती.

त्याचे प्रमुख भोकरचे सहायक पोलिस अधीक्षक विजय कबाडे व त्यांच्या मदतीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, डी.डी.भारती, संतोष शेकडे शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, दशरथ खाडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश घोडके आदींनी तपास केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आणि गुन्हे शाखा, पोलिस ठाणे यांच्यामार्फत तपास करणे चालू होते.

सदर गुन्ह्याबाबत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जाऊन तपास करण्यात आला. तपासादरम्यान आत्तापर्यंत सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या नंतरही तपासात आणखी काही धागेदोरे मिळतील अशी दाट शक्यता पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इन्‍द्रपालसिंह ऊर्फ सनी सिंग मेजर (वय ३५), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५), सतनाम सिंग ऊर्फ दलबिर सिंह शेरगिल (वय २८) हरदीपसिंग ऊर्फ सोनू पिनिपाना सतनाम सिंग बाजवा (वय ३५) गुरूमुखसिंग ऊर्फ गुरी सेवकसिंग गील (वय २४) आणि करणजितसिंग रघबिरसिंग साहू (वय ३०, सर्व रा. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निसार तांबोळी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT