file photo 
मराठवाडा

नांदेडची 'ही’ बँक मराठवाड्यात अव्वल...कोणती ते वाचा... 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा महा लॉगीन दिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यांचा मान ग्रामीण शाखा डाकपाल महिलेला मिळाला आहे.

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ४२० शाखा डाक घरे, एक मुख्य पोस्ट ऑफिस, व ५१ पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी यांनी महा लॉगीन दिवसानिमित्ताने सकाळपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती.
या मोहिमेत १२ हजार ८६२ खाते उघडण्यात आले. जवळपास दिलेल्या संकल्प ९९.०७ टक्के पूर्ण करण्यात आला.

हेही वाचाशिव चरित्रातुन पन्नास वर्षाचे नियोजन कसे ते वाचा
 

महिला पोस्ट मास्तरचा विक्रम 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक महालॉगीन दिवशी सर्वात जास्त पोस्ट बँकेचे खाते उघडणारी कलंबर बीओ मुखेड चे ब्रँच पोस्ट मास्तर जान्हवी सुभाष नेंनताबाजे यांनी १९३ खाते उघडून जिल्ह्यात विक्रम करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पात्र ठरल्या आहेत. आदिवासी व दुर्मिळ भागातील मु. पो. परोटी बीओ इस्लापुर येथील शाखा डाकपाल रवी वाडीकर यांनी १७५ खाते उघडून द्वितीय क्रमांकाचे तर तुपा बीओ सिडको येथील शाखा डाकपाल अजय श्रीनिवार यांनी १५३ खाते उघडून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले.

प्रोत्साहनपर बक्षिस 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखेचे प्रबंधक एम. राजेंद्र यांनी पोस्ट बँकेच्या महा लॉगीन दिवशी सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिसे खालील प्रमाणे ठेवली आहेत.
प्रथम १००१ रुपये व एक वर्षांसाठी दोन लाखाचा अपघाती विमा.
दुसरे ५०१ व दोन लाखाचा एक वर्षांसाठी अपघाती विमा.
तिसरे २५० व एक वर्षांसाठी दोन लाखाचा अपघाती विमा.

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यानी केले कौतुक  

तसेच सुरेश सिंगेवार मार्केटिंग एक्सिकेटीव्ह यांनी सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुपये ५५१ रोख रक्कम बक्षीस म्हणून डाक अधीक्षक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी सर्व नांदेड डाक टीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक महा लॉगीनच्या दिवशी खूप मेहनतीने कामे केली त्या सर्वाचे अभिनंदन केले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' ५ जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; हवामान विभागाचा अंदाज

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 फेब्रुवारी 2026

U19 World Cup: भारताच्या पाकिस्तानवरील विजयाने सेमीफायनलचं वेळापत्रक निश्चित! जाणून घ्या कोणाविरुद्ध अन् कधी होणार सामना

आजचे राशिभविष्य - 2 फेब्रुवारी 2026

Satara News: अजितदादांच्या आठवणींनी दाटला नेत्यांचा कंठ; साताऱ्यातील सर्वपक्षीय शोकसभेत हळहळ, विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार!

SCROLL FOR NEXT