file photo 
मराठवाडा

नांदेडचे ‘न्यू इयर’ राजकारणाने तापणार...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नवीन वर्षात नांदेड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. त्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावली असून त्यात कॉँग्रेस, भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेतेमंडळी आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. सध्या थंडीचे दिवस असून वाढत्या थंडीत जिल्ह्यातील ग्रामिण भागातील राजकारणही तापणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणुक आता येत्या ता. सहा जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली असून या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता निवडणुकीसाठी बारा दिवस शिल्लक असून इच्छुकांनी आपआपल्या परीने तयारी सुरु केली आहे. 

निवडणुकांचा कार्यक्रम घोषित


जिल्ह्यातील १६ पंचायत समिती आणि उपसभापतीपदाची मुदत ता. २० डिसेंबर रोजी संपली होती. त्यामुळे नवीन निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या पूर्वी ता. २१ डिसेंबर रोजी निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र, त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सभापती आणि उपसभापती निवडीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. ता. सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्या त्या पंचायत समिती सभागृहात विशेष बैठकीत सभापती व उपसभापतीपदाची निवडणुक होणार आहे. 

पीठासीन अधिकारी नियुक्त


सभापती, उपसभापती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी आणि तहसीलादार यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. लतिफ पठाण (नांदेड), सुजित नरहरे (अर्धापूर), पवन चांडक (भोकर), दिनेश झांपले (मुदखेड), महेश वडदकर (हदगाव), नरसिंग जाधव (हिमायतनगर), नरेंद्र देशमुख (किनवट), सिद्धेश्‍वर वरणगावकर (माहूर), राजेंद्र शेळके (धर्माबाद), माधव बोथीकर (उमरी), शरद झाडके (बिलोली), सुरेखा नांदे (नायगाव), शक्ती कदम (देगलूर), काशीनाथ पाटील (मुखेड), पांडुरंग बोरगावकर (कंधार) आणि विठ्ठल परळीकर (लोहा).

अध्यक्षपदाची निवडही लवकरच 


नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणुकही येत्या ता. ३१ डिसेंबर रोजी घोषित झाली होती. मात्र, ती निवडणुकही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता अध्यक्षपदाची निवडणुकही पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीपाठोपाठ होणार आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात आणि थंडीच्या वातावरणात ग्रामिण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT