file photo 
मराठवाडा

‘एकात्मिक रोग’ सर्वेक्षणात नांदेडची भरारी 

नवनाथ येवले

नांदेड : शहरी व ग्रामीण भागातील जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सनियंत्रण देखरेख उपाययोजनांची देवाण-घेवाण करण्यासाठी जिल्हास्तरावर एकात्मिक रोग सर्वेक्षण करण्यात येते. ग्रामीण भागातील आरोग्य संस्था, तालुकास्तरीय आरोग्य संस्था, जिल्हास्तरीय देखरेख संस्था यांच्यामार्फत माहिती तंत्रज्ञाणाचा योग्य वापर करुन राज्यात नांदेड जिल्ह्याने एकात्मिक रोग सर्वेक्षणामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे लौकीक मिळविले आहे.

साथरोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आजारसंबधी माहिती वेळेत मिळणे व त्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण होणे गरजेचे असते. त्यामुळे तात्काळ निर्णय घेवून उपाययोजना करता येणे शक्य होते. जिल्हा परिषद एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प विभागाच्या माध्यमातून जिल्हाअंतर्गत विविध भागातुन आजारांची माहिती गोळा करुन ती शासनाच्या आयडिएसपीच्या संकेतस्थळावर दर आठवड्याला भरली जाते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या धोरणांनुसार शासनस्तरावरुन ‘ रिअल टाइम डेटा’ गोळा करण्यास प्राधान्य अनिवार्य आहे. त्यामुळे माहितीचे विश्लेषण करुन साथ रोग उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही शक्य होते.

सर्वेक्षण अधिकाऱ्यांचा सन्मान 
अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व स्तरावरील माहितीची देवाण- घेवाण अधिक गतीमान करुन साथीचे रोग प्रतिबंधकात्मक तात्काळ उपाय योजना करण्यासाठी ‘रिअल टाईम डेटा’ गोळा करुन जिल्ह्यात गृहभेटीद्वारे प्राथमिक उपचाराद्वारे माहिती घेतली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकिय अधिकार आणि प्रयोगशाळांच्या माध्यमातून तपासणीद्वारे रुग्णांची जलजन्य व किटकजन्य यासारख्या ३३ प्रकारच्या आजारांवर तात्काळ अटकाव घालता येतो. आयएचआयपीच्या राज्यस्तरीय उद्घाटनप्रसंगी सोमवारी (ता.३०) डिसेंबर २०१९ रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रविण मुंडे यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिपकुमार व्यास व आरोग्य सेवा पुणे संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. 

राज्यात तिसरा क्रमांक 
जिल्हाआधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर, मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आरोग्य सभापती माधवराव मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने राज्यात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आरोग्य विभगाची उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य विभगाच्या प्रयोगशाळामधील संबंधीत कर्मचाऱ्यांना संगणक, मोबाईल तसेच संपर्काच्या अन्य साधनाद्वारे माहिती भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून ‘रिअल टाइम डेटा’ मिळवता येतो. माहिती तंत्रज्ञानाच्या अधुनिक साधनांचा वापर करुन माहिती उपलब्ध करण्यात राज्यात जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला आहे. 

आवश्यक उपचार व काळजी घेता येते
साथीचे आजार तसेच जलजन्य आजारासह एकूण ३३ प्रकराच्या आजरांची शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गवारी करणारे एक सॉप्टवेअर तयार करण्यात आले. या अंतर्गत एखाद्या गावातील, आरोग्य केंद्र, रुग्णालयातून साथीच्या आजारांची माहिती आल्यानंतर त्यांची गाव, तालुकानिहाय माहितीसह आवश्यक वर्गवारी केली जाते. यातुन कोणत्या ठिकाणी किती तिव्रतेचा साथ उद्रेक झाला आहे व त्याचे स्वरुप यांची तात्काळ माहिती मिळून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संबंधीत ठिकाणी आवश्यक ते उपचार व काळजी घेण्याचे आदेश जारी होतील

डॉ. बालाजी शिंदे: जिल्हा आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT