Nationalist Youth Congress Agitation
Nationalist Youth Congress Agitation  esakal
मराठवाडा

उमरग्यात महागाई विरोधात राष्ट्रवादीचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात तालुक्यात अनोखे आंदोलन करण्यात आले. विशेष केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेले फलक व घोषणा देत गुरूवारी (ता.२१) हुतात्मा स्मारकापासुन तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुचाकी फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. २०१४ या वर्षांची नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेली फसवी भाषणे वाजवुन उपरोधात्मक घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून, वेळोवेळी इंधन दरवाढ करत आहे. महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या फसव्या योजनांची माहिती जगजाहीर करून इंधन दरवाढ कमी न झाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी दिला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Youth Congress) पदाधिकारी दुचाकी वाहनासह (Umarga) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी प्रदेश सदस्य पद्माकरराव हराळकर, तालुकाध्यक्ष संजय पवार, विधानसभा युवक अध्यक्ष बाबा पवार, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, उपाध्यक्ष प्रताप तपसाळे, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, ग्रंथालय सेलचे जगदीश सुरवसे, उमाकांत पाटील, भैय्या शेख, सरपंच रंणजीत गायकवाड, बाबा सोनकांबळे, बाळू बुंदगे, राजकुमार माने, मिर्झा बेग, संजय जाधव, वाघंबर सरवदे, अजित पाटील, नेताजी कवठे, राजू तळीखेडे, फय्याज पठाण, अभय पाटील, ज्ञानदीप सूर्यवंशी, कमलाकर पाटील, बाळू फरताळे, राम सुरवसे, अभिषेक वडदरे, विठ्ठल अंबुलगे, मारुती होगाडे, बाबुराव कुकूर्डे, खंडू काळे, सुरेश वाकडे, माधव नागरे, भरत देडे, दिलदार मोजीनदर, दिलीप जाधव, पवन पाटील, विष्णू गायकवाड, कृष्णा पांचाळ, राजू तुरोरीकर, राहुल पवार, संभाजी कांबळे, इरफान पटेल, हाजी सय्यद इस्माईल जमादार, विजय पाटील, व्यंकट बिराजदार, सचिन सुरवसे, प्रभाकर माने, कुमार थिटे, अनिकेत तेलंग, राजाभाऊ तुरोरीकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT