1Admission_3_34 
मराठवाडा

नवोदय परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात

विकास गाढवे

लातूर  : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश परीक्षेसाठी गुरूवारपासून (ता. २२) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. पाचवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असून, विद्यार्थ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. रामू यांनी केले आहे.


ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या दरवर्षी विद्यालयातील ८० जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. परीक्षेतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत भोजन, गणवेश, निवास, वह्या, पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते. केंद्रीय शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम विद्यालयात शिकवला जातो.

येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षेची तयारी सुरू झाली असून, पाचवीत शिक्षण घेत असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थी, पालक व शाळांनी www.nvshq.org किंवा www.nvsadmissionclasssix.in या संकेतस्थळावरून हे ऑनलाईन अर्ज करावेत व अधिक माहितीसाठी विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रामू यांनी केले आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अवैध फेरीवाल्यांना आता रेल्वेच्या परिसरात प्रवेश नाही! रेल्वेचे नवीन नियम; नवीन डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली काय आहे? वाचा...

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Zomato Hikes: Zomato चा धक्का! प्लॅटफॉर्म फी पुन्हा वाढली, जेवण ऑर्डर करणं महाग; आता एका ऑर्डरला लागतील एवढे पैसे

SCROLL FOR NEXT