नवाब मलीक
नवाब मलीक Sakal
मराठवाडा

जमिनी बळकवणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकणार, नवाब मलिकांचा इशारा

निसार शेख

आष्टी (जि.बीड) : मराठवाड्यात अनेक फर्जीवाडे आहेत. आष्टीत ही फर्जी वाडा आहे. येथील वक्फ बोर्डाच्या तसेच हिंदू देवस्थानच्या जमिनी खोटे दस्तावेज तयार करून बळकावल्या आहेत. त्यांनीच मतदानात ही फर्जी वाडा केला आहे. हा फर्जी वाडा उघड करून जमिनी बळकावणाऱ्यांना लवकरच तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला. आष्टी शहरातील नागरिकांनी दहशतीखाली न राहता दहशत मुक्त करण्यासाठी आमची फौज सदैव तयार असल्याचे प्रतिपादनही मलिक यांनी सोमवारी (ता. २०) नगरपंचायत निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या प्रचारार्थ आष्टी (Beed) येथे झालेल्या जाहिर सभेत केले. पुढे बोलताना मलिक म्हणाले, 'नमस्ते ट्रम्प 'च्या नादात कोरोना काळात अनेक मृत्युमुखी पडले. (Nawab Malik Said, Land Grabbers To Be Jail Very Soon Beed News)

त्यांची जबाबदारी मोदी सरकारची आहे. महाराष्ट्रात एक ही रुग्ण औषधा वाचून मृत्युमुखी पडले नाही. भाजप सरकार करु शकले नाही. ते १ महिन्यात महाविकास आघाडी सरकारने केले. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केले. सरकारने शेतकऱ्यांना संकटात साथ दिली.आष्टी हा फर्जी वाडा झाला असून ज्यांनी फर्जी (बनावट) दस्तऐवज तयार केली तोच नागरिकांना भिती दाखवत आहे. आष्टी तालुक्यात मशिद, मंदिर व इतर देवस्थानाच्या इनामी जमिनी हडप केल्या त्यांनीच दौंडमध्ये ही जमीन सोडल्या नाहीत. भाजपच्या विरोधात कोणी काही बोलले तर ईडीच्या माध्यमातून चौकशीसाठी घरी पाहुणे पाठवतात.

आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. देवेंद्र फडवणीस म्हणत असतात नवाब मालिकांच्या घरी छापा टाका मी वाट पाहात आहे. भाजप सरकार ओबीसी आरक्षण मिळण्यास अडथळा निर्माण करत आहे. आरक्षण मुक्त भारत करण्याचे काम भाजप करत आहे. हा भाजपचा अजेंडा आहे. आपण सावध राहिले पाहिजे असे ही नवाब मलिक यांनी जाहीर सभेत सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT