suresh birajdar and baba jafari sakal
मराठवाडा

Umarga News : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा

उमेदवारी निश्चित असताना ऐनवेळी शेवटच्या क्षणात दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला पक्ष प्रवेश करून संधी देण्यात आली.

अविनाश काळे

उमरगा, (जि. धाराशिख) - उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना उमेदवारी डावलल्याने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी गुरुवारी (ता. चार) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रा. बिराजदार यांना उमेदवारी दिली नसल्याचा निषेध नोंदवला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात श्री. जाफरी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. सुरेश बिराजदार यांना मागील सहा महिन्यापूर्वी धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घेणार असल्याचे सांगुन निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा अशी सूचना केली होती. त्या दृष्टीने प्रा. बिराजदार संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजुन काढला होता.

उमेदवारी निश्चित असताना ऐनवेळी शेवटच्या क्षणात दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला पक्ष प्रवेश करून संधी देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून प्रा. बिराजदार जिल्ह्यातील गावागावात जाऊन पक्षाचा झेंडा पोंचवला आहे, मात्र त्यांच्या सारख्या निष्ठावान नेत्यांना डावलले जाते, ही बाब निषेधार्थ आहे. असे सांगत श्री. जाफरी यांनी एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

कार्यकर्त्यांच्या व्यक्त केल्या संतप्त भावना

एक निष्कलंक, मितभाषी व्यक्तीमत्व म्हणुन प्रा. बिराजदार यांची ओळख आहे. त्यांच्या सर्वसमावेशक कार्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल असे वातावरण होते. मात्र ऐनवेळी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्याच्या हालचाली झाल्या. प्रा. बिराजदार यांना डावलल्याने कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना समाज माध्यमावर उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Reservation: महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत ट्विस्ट? जुनी पद्धत बदलणार? 'या' तारखेला जाहीर होणार आरक्षण

Lonand politics: लाेणंदेचे डॉ. नितीन सावंत भाजपमध्ये दाखल; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

Emotional Viral Video : कष्टाचं चीज केलं ! मुलाची सीआरपीएफमध्ये निवड, भाजीविक्रेत्या आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Nanded Accident : खासगी बस उलटल्याने ४८ ‘होमगार्ड’सह ५० जखमी; पुणे, पिंपरी-चिंचवडहून परतताना अपघात

'मला या घरात आता राहयचं नाही' राकेश आणि अनुश्रीमध्ये बेडवरुन कडाक्याचं भांडण, खरंच राकेश घराबाहेर जाणार?

SCROLL FOR NEXT