MLA Babajani Durrani esakal
मराठवाडा

पाथरीत राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना धक्काबुक्की

दुर्राणी चर्चा करत असतांना अचानक आलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

सकाळ वृत्तसेवा

पाथरी (जि.परभणी) : अत्यंविधीसाठी पाथरी शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांना एकाने धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण पाथरी (Pathari) शहरात तणावाचे वातावरण पसरून बाजारपेठ बंद कऱण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मोहमंद चाऊस या व्यक्तीविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे. पाथरी शहरातील नागरिक लालू कुरेशी यांच्या अंत्यसंस्कारासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी हे गुरुवारी दुपारी माळीवाडा परिसरातील जुम्मा मशीद कब्रस्थान येथे आले होते. त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, बखतीयार खान व जुबेर बीन हावेल यांच्याशी दुर्राणी चर्चा करत असतांना अचानक तेथे आलेल्या (Parbhani) मोहम्मद बीन सईद बीन किलेब चाऊस याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

आमदार दुर्राणी यांना धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितीतांमध्ये एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पाथरी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली. व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद करून घेतली. दरम्यान, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या प्रकारानंतर पाथरी पोलिस ठाण्यात मोहंमद चाऊस यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायकवाड हे करीत आहेत.

हद्दपार करा व्यापाऱ्यांकडून निवेदन

आमदार बाबाजानी दुराणी यांच्यावर हल्ला करणारे मोहंमद चाऊस हे शहरातील शांतता भंग करत आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मोहम्मद चाऊस यांना हद्दपार करावे अन्य़था सोमवार २२ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने बेमुदत बंद ठेवतील अशा आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आरिफ खान यांनी तहसीलदार, पाथरी यांना दिले आहे. निवेदनावर पप्पूसेठ लाहोटी, बालकिशन राठी, शिवाजी चिंचाने, राजेश परतानी, गजू उंबरकर, जगदीश राठी यांच्या स्वाक्षरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT