NCP MLA Sandeep Kshirsagar beaten up his father non-cognizable offense case registered in beed  ncp
मराठवाडा

Beed News : राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराकडून स्वतःच्या वडिलांना धक्काबुक्की; अदखलपात्र गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी केला. याबाबत त्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली व माझ्यासह बहिणींना घराबाहेर हाकलून दिल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

यावरुन संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT