NCP Contest Lohara Nagar Panchayat Elections 
मराठवाडा

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार निवडणूक, लोहारा नगरपंचायतीसाठी बैठक

नीळकंठ कांबळे

लोहार (जि.उस्मानाबाद) : आगामी होऊ घातलेल्या लोहारा नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे, असा निर्णय पक्षाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मुदत संपत आल्याने लोहारा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन महिन्यानंतर होणार आहे. या अनुषंगाने निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे शहरातील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, गोविंदराव साळुंके, माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, धानुरीचे नवनिर्वाचित उपसरपंचपदी विठ्ठल बुरटूकणे, भातागळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक गगन माळवदकर, विजय लोमटे, मिलिंद नागवंशी, जालिंदर कोकणे, नवाज सय्यद, शब्बीर गवंडी, हेमंत माळवदकर, विनोद लांडगे, बाबा शेख, बहादूर मोमीन, मुक्तार चाऊस, प्रकाश भगत, भागवत वाघमारे, सुरेश वाघ, बालाजी मेनकुदळे, लक्ष्मण रसाळ, राजपाल वाघमारे, पृथ्वीराज जगताप, सूरज साळुंके, सरफराज इनामदार, राज चाऊस, समीर शेख, हमीद पठाण आदींची उपस्थिती होती.


कार्यकर्त्यांनी तयारी करावी
जिल्हाध्यक्ष बिराजदार म्हणाले, नगरपंचायतीची यापूर्वीची झालेली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळीही निवडणूक स्वबळावर लढवायची आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी, पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे. तसेच आपल्या पक्षाच्या जास्तीत-जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT