संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

रक्तदानही करावे लागणारच...

महेश गायकवाड

जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढीकडून करण्यात आले आहे. सध्या रक्तपेढीत ए आणि एबी पॉझिटिव्ह रक्त गटाची कमतरता भासत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णासह जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतींना जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त पेढीतून मोफत रक्त उपलब्ध करून दिल्या जाते.

सध्या कोरोनामुळे संचारबंदीमुळे रक्तदान शिबिरे घेता येत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढीत सध्या बी आणि ओ पॉझिटिव्ह रक्ताचे प्रत्येकी १५ युनिट शिल्लक आहे. तर ए पॉझिटिव्हचे केवळ एक रक्त पिशवी शिल्लक आहे. 

खासगी रक्तपेढ्यांकडील माहिती कळेना 

शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्यास खासगी रक्त पेढीतून रक्त उपलब्ध करून दिल्या जाते. कोणत्या रक्तपेढीत किती रक्त उपलब्ध याची माहिती ई रक्तकोष या पोर्टल वर भरणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही रक्तपेढीने आपली माहिती भरलेली दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या संकटाच्या काळात जनसामान्यांची धावपळ होत आहे. 

रक्त उपलब्ध असताना दिला खासगी रक्तपेढीचा अर्ज 

एक निराधार महिला ॲनिमियाच्या आजाराने त्रस्त असल्याने शेजारच्या महिलेने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रक्ताची गरज भासल्याने आरोग्य कर्मचाऱ्याने रुग्णालयातील पेढीत रक्त उपलब्ध असताना एका खासगी रक्तपेढीचा अर्ज भरून देऊन रक्त आणण्यास सांगितल्याचा तसेच शुल्काची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.२७) सकाळी समोर आला.

याबाबत विचारणा केली असता, शासकीय रिक्तपेढीतून जेष्ठ नागरिक , गर्भवती, लहान बालके व दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना मोफत रक्त दिल्या जाते. सदर महिलेकडे रेशन कार्ड नव्हते. मात्र, पैसे नसल्याची अडचण लक्षात घेऊन रक्त पिशवी देण्यात आली आहे, असे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अरुण धोत्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

IPL 2026 मध्ये 'इम्पॅक्ट खेळाडू' चा नियम राहणार की नाही? रोहित, विराट, अक्षर यांच्या विरोधानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर; बैठकीत बरंच काही घडलं

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा प्रकरणात रूपाली चाकणकर यांना हटवा; महिला पदाधिकाऱ्यांचे सुनेत्रा पवार यांना पत्र

SCROLL FOR NEXT