Chandrakant Handore
Chandrakant Handore sakal
मराठवाडा

धम्म आचरणातुन मानवतावादी होण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज; चंद्रकांत हंडोरे

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) :अस्पृश्य समाजापासुन ते बहुजन समाजाला भारतीय घटनेच्या माध्यमातुन रेशमाच्या धाग्यात बांधण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. babasaheb ambedkar) यांनी केले. पण दुर्देवाने स्वातंत्र्याच्या पासष्ठीनंतरही अजुन कांही प्रमाणात जातीयवाद, विषमता आहे. ते दुर करण्यासाठी गौतम बुद्धाच्या धम्माचे आचरण करुन वैचारिक प्रगल्भतेने मानवतावादी होण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. असे मत माजी सामाजीक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या कपिल वस्तू बौद्धविहार परिसरात शुक्रवारी (ता. ३१) आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. हंडोरे बोलत होते. माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. कळंबचे माजी आमदार दयानंद गायकवाड, डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो, भन्ते सुमेध नागसेन, भंते सुमंगल, भन्ते डी. धम्मसार, प्राचार्य कमलाकर कांबळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, विरोधी पक्षनेते प्रकाश आष्टे, माजी सभापती हरिष डावरे, मोहन माने (लातूर), एन.के. कांबळे, शशिकांत बनसोडे (मुंबई), संपत लगाडे, शंकर ढोबळे, कमलाकर कोथळीकर (नांदेड), एस. के. चेले, अँड. शीतल चव्हाण, वामन डावरे, रामभाऊ गायकवाड, दत्ताभाऊ रोंगे, कमलाकर सूर्यवंशी, सतीश सुरवसे, सिद्धार्थ माने (सांगली), धनंजय शिंगाडे, प्रा. शौकत पटेल, डॉ. गणपत शिंदे (गुलबर्गा) आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. हंडोरे म्हणाले कि, बौद्ध धर्मात पुनर्जन्म मानला जात नाही परंतु डॉ. बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर कदाचित आपला पुनर्जन्म झाला नसता. असे आम्हाला वाटते. वंचित, कष्टकरी समाज बांधवांच्या हक्कासाठी एकत्र येण्यासाठी ऐक्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकमेकांच्या तंगड्या ओढण्यात, शिव्या देण्यात वेळ घालवला जातो. त्यामुळे समाज बांधवांनाही राजकारण्यांचा विट आलाय. म्हणुनच कि काय बौद्ध धम्म परिषदेला स्वतःहुन लोक येताहेत. यातुन मिळणाऱ्या वैचारिक शिदोरीतुन जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. या वेळी माजी मंत्री श्री. पाटील म्हणाले कि, देशाला नव्हे तर जगाला गौतम बुद्धांच्या विचाराला मान्यता मिळाली आहे. गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले, बसवेश्वर आणि गांधी या चार महात्मांच्या विचाराच्या प्रगल्भतेमुळे राष्ट्रीय एकात्मता अखंडित राहिली आहे. बुद्धांच्या विचाराचा जागर धन्म परिषदेच्या माध्यमातुन करण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाचेही कौतुक व्हायले हवे. माजी मंत्री श्री. हंडोरे यांनी मागास समाज बांधवांसाठी मोठे विकासात्मक काम केले आहे. असे ते म्हणाले. ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिल्लारे, उपाध्यक्ष मत्सेंद्र सरपे, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, मिलिंद सूर्यवंशी, संजय सरपे, राजू भालेराव, शेषेराव कांबळे, मनोहर सूर्यवंशी, जी. एस. साबळे, डी. टी. कांबळे, फुलचंद गायकवाड, एन. सी. गायकवाड, चंद्रकांत कांबळे, गोविंद कांबळे, अशोक बनसोडे, सतीश सुरवसे, प्रा. सुर्यकांत वाघमारे, गो. ल. कांबळे, धिरज बेळंबकर आदींनी परिषदेच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी आभार मानले.

बुद्धांच्या विचाराने प्रगती साध्य : डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो

बौद्धाच्या तत्वाचं धन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले आहे, त्याचे सार्थक करा. बौद्धमय देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी धम्म बांधवांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. दलितांना सन्मानाने जगण्यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिला असून देशातील दलित वंचीत घटकास बौद्ध धम्म हा एकमेव आधारवाड आहे, त्याच्या आचरणाने मानवी जीवनाची प्रगती साध्य होते. असे मत डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी व्यक्त केले. या वेळी भन्ते सुमेध नागसेन, भंते सुमंगल, भन्ते डी. धम्मसार यांचेही मार्गदर्शन झाले.

कडूबाईच्या गीताने धमाल उडवली

प्रसिद्ध भिमगीत गायिका कडुबाई खरात यांनी "आपण खातो त्या भाकरीवर माझ्या बाबांची सही हायरं या मंजूळ आवाजाने गायिलेल्या गीताला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT