A new corona patient in Hingoli District
A new corona patient in Hingoli District 
मराठवाडा

Coronavirus : हिंगोली जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यासाठी बुधवार (ता. १५) दिलासादायक ठरला. दिवसभरात जिल्ह्यात केवळ एकाच व्यक्तीला बाधा झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३६२ वर पोचली आहे. बाधित रुग्ण महिला असून, ती पारडी येथील रहिवासी आहे. तिच्यावर सध्या वसमत येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ती पुण्यावरून वसमत येथे आली होती, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी २९२ रुग्ण बरे झाले. सद्यःस्थितीत ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथे १७, कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये १९, कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे सहा, कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत २६ कोरोनाचे रुग्ण आहेत.  कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे दोघांवर उपचार सुरू आहेत. या ७० रुग्णांपैकी ६८ जणांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यात कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, दोघांची रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ६,०७७ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ५,४६७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५,३२७ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  
 
हिंगोली कोरोना मीटर  

  • एकूण पॉझिटिव्ह : ३६२
  • आजचे पॉझिटिव्ह : ०१
  • उपचार सुरू : ७०
  • बरे झालेले  : २९२
  • एकूण मृत्यू : शून्य 
  • आजचे मृत्यू : शून्य

(संपादन : विकास देशमुख)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT