SBI BANK
SBI BANK E SAKAL
मराठवाडा

Parbhani :नवीन पासबूक नसल्याने हेळसांड

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भारतीय स्टेट बँकेत जनधन बचत खातेदारांना नवीन बारकोड पासबुक मिळत नसल्याने खातेदारांची गैरसोय होत आहे. दरम्यान, बॅँकेच्या शाखाधिकारी व सहायक शाखाधिकारी यांच्या समन्वय नसल्याने जनधन खातेदारांची हेळसांड होत आहे.भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्रात जनधन बचत खाते उघडले जाते. परंतु, खाते उघडून पाच-सहा वर्षे झाल्यानंतरही खातेदारांना दुसरे नवीन पासबुक घेण्यासाठी बॅँकेकडून ग्राहक सेवा केंद्रात पाठविले जाते. पण, ग्राहक सेवा केंद्र चालक खातेदारांना परत बॅँकेत पाठवतात. खातेदारांना टोलवाटोलवी करत असल्याने खातेदारांत नाराजीचा सूर उमटत आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी ही सर्वांत मोठी बाजारपेठ असून, भारतीय स्टेट बँकेला जवळपास परिसरातील ४० ते ५० गावांचे खातेदार आहेत. बँकेमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार यांचे बचत खाते असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. बॅंकेत जवळपास सत्तर हजार बचत खातेदार असून, रोज चारशे-पाचशे खातेदार बॅंकेत आर्थिक व्यवहार करतात. पासबूक नसल्याने बॅंकेत केलेल्या व्यवहाराची नोंद मिळत नाही.

बॅंकेत सेंटमेंन्टची मागणी केल्यास आर्थिक चार्ज लावण्यात येत आहे. यामुळे बचत खातेदारांना नाहकच आर्थिक झळ सोसावी लागत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी व सहायक शाखाधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पासबूक घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेचा कारभार सुरळीत करावा व जनधन बचत खातेदारांना नवीन बारकोड पासबूक द्यावे, अशी मागणी खातेदारांकडून होत आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयात संपर्क केला. बारकोड पासबुक बॅँकेने द्यावा का ग्राहक सेवा केंद्र यांनी द्यावा? याची माहिती मागवली आहे. अद्यापही माहिती न मिळाल्याने जनधन खातेदारांना नवीन पासबुक देण्यासाठी असमर्थ आहोत.

- पंकज गुप्ता, सहायक शाखाधिकारी, जिंतूर बोरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT