file photo
file photo 
मराठवाडा

भाजपने राखले तीनही गड

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात महायुतीचे वारे असल्याने जिल्ह्यात नऊही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यात औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे, फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि गंगापुरातून प्रशांत बंब विजयी झाले. तिन्ही जागेवर अटीतटीच्या लढती झाल्या. तिन्ही मतदारसंघांत केलेली कामे आणि लोकसहभागामुळे भाजपला तिन्ही गड राखण्यात यश आहे. 


पूर्व मतदारसंघात युती झाल्यामुळे एमआयएमचा पराभव होऊ शकला. युती तुटली असती तर या जागेवर एमआयएमचा उमेदवार विजयी झाला असता. पूर्व मतदारसंघात महायुतीचे अतुल सावे यांना या निवडणुकीसाठी मोठी ताकत पणाला लावली होती. यासह मुख्यमंत्र्यांचे या मतदारसंघावर लक्ष होते. राज्यमंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे सावे यांच्याविषयी विशेष सहानुभूती होती. यासह लोकसभेत शिवसेनेचे केलेले काम शिवसैनिकांनी लक्षात ठेवले आणि या निवडणुकीत सावेंचे काम केले. मतदारसंघात केवळ 60.9 टक्‍के मतदान झाले होते. यात मुस्लिम पट्ट्यात मतदान जास्त झाले होते. यामुळे निकालाच्या दिवशी आठ फेऱ्यापर्यंत वन साईड मते एमआयएमला मिळाली. एमआयएम आणि वंचितचे मते विभाजन होईल असे वाटले होते; मात्र तसे झाले नाही. तरी सावे यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात झालेले मतदान हे निर्णयक ठरले. 


फुलंब्रीत चर्चेवर मात 

फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना वयामुळे तिकीट मिळणार नाही. अशी एक चर्चा निवडणुका लागण्यापूर्वी सुरू झाल्या होत्या. यामुळे पक्षातील काही उमेदवार कामालाही लागले होते. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत बागडे यांनी तिकीट तर मिळवलेच शिवाय प्रचारातही पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे मतदारसंघ पिंजून काढला. दांडगा जनसंपर्क आणि मदतीसाठी असलेली तत्परता यामुळेच हरिभाऊ बागडे यांच्या पाठीशी मतदार उभा राहिला. बागडे हे 14 हजार मतांच्या लीडने निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. कल्याण काळे यांनीही यावेळी पूर्ण ताकत पणाला लावली होती. मात्र, बागडे यांनी केलेले काम आणि जनतेने त्यांना दिलेली साथ विजयासाठी महत्त्वाचे ठरले. एवढे नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरून पक्ष कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा झाली. यासह बागडे यांची वेगवेगळ्या गावांत झालेल्या सभाही निर्णायक ठरल्या. फुलंब्री तालुक्‍यातील राधाकिसन पठाडे, राम शेळके यांच्यासह भगवान घडामोडे, विजय औताडे, अनुराधा चव्हाण, सुहास सिरसाट, गाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. 


प्रशांत बंब यांची हॅट्ट्रिक 

गंगापूर: गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक न होण्याची परंपरा युतीचे प्रशांत बंब यांनी मोडीत काढली. राष्ट्रवादीचे संतोष माने यांचा तब्बल 34 हजार 900 मतांनी पराभव करत बंब यांनी विक्रम प्रस्थापित केला. प्रभावी प्रचार आणि सुयोग्य नियोजनातूनच बंब यांनी तिसऱ्यांदा विधानसभा गाठली आहे. यावेळची निवडणूक सर्वार्थाने लक्षवेधी राहिली. मतदारसंघात सर्वांत प्रथम प्रशांत बंब यांची उमेदवारी जाहीर झाली असली, तरी तत्पूर्वीच त्यांनी तयारी सुरू केलेली होती. आपले नेतृत्व व कर्तृत्वगुण सिद्ध करताना आमदार बंब यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला. या निवडणुकीत जातीच्या गणितावर प्रशांत बंब यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याने या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT