File photo
File photo 
मराठवाडा

छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह : शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील बिरूदेव मंदिर शिवारातील एका शेतात अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या व्यक्‍तीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

गळा, पोट व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत निर्दयपणे निर्घृण खून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

बिरूदेव मंदिर शिवारात असलेल्या विहिरीच्या बाजूला सुनील शिंदे यांचे शेत आहे. बुधवारी (ता. 15) दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी एका अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. हा प्रकार निदर्शनास येताच शेतमालक सुनील शिंदे यांनी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. मृताचे वय अंदाजे 30 ते 40 असून, गळा, हात व पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले.

मृताच्या एका हातावर भाग्यश्री असे नाव गोंदलेले आहे. अंगात काळी पॅंट व पांढरा शर्ट असून, ती व्यक्ती प्रथमदर्शनी उदरनिर्वाहासाठी कोठे तरी कामाला अथवा मजुरी करणारी असावी, असा अंदाज आहे. 

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह आढळून आला. मंगळवारी (ता. 14) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तपास जलदगतीने सुरू केला. रात्री सातपर्यंत पोलिस घटनास्थळी होते. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

उस्मानाबादेत विवाहितेची आत्महत्या 
उस्मानाबाद : सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंद झाला. 


शीतल मारुती झोंबाडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती मारुती रमेश झोंबाडे, सासू मालन रमेश झोंबाडे दोघे (रा. राजुरी, ता. परंडा) यांनी लग्नात द्यावयाचे राहिलेले दागिने माहेराहून आणण्याकरिता शीतलकडे तगादा लावला होता. मागील अडीच वर्षांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

सततच्या त्रासाला कंटाळून शीतलने सोमवारी (ता. 13) आठच्या सुमारास राजुरी येथील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. मारुती नामदेव कांबळे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT