File photo
File photo 
मराठवाडा

नऊ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये आतापर्यंत १८ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या खात्यावर १५७ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अपलोड केलेल्या यादीमध्ये अजुनही नऊ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून ते पात्र यादीमध्ये समावेश होण्याची वाट पाहत आहेत. तर अपलोड करण्याची प्रक्रिया अजुनही सूरुच आहे, अद्याप जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची नावे अपलोड झालेली नाहीत.

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे यादीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे चित्र आहे.त्याचा मोबाईलवर संदेश देखील प्राप्त होत आहेत,साहजिकच यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. अस असले तरी अजुनही जवळपास नऊ हजारावर शेतकऱ्यांना पात्र असूनही नव्या यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर अजुनही काही शेतकऱ्यांची नावे अपलोड कऱण्याचे काम सूरुच आहे.

सहकार विभागाकडुन हे काम गतीने सूरु असून त्याचप्रकारे राष्ट्रीयीकृत बँकासुध्दा आता कर्जाची रक्कम मिळणार यामुळे त्यानी गती वाढविल्याचे दिसून येत आहे.त्यातच शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बाकी असलेले नियमित कर्जदार यांनाही पन्नास हजाराची रक्कम मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर एकरकमी परतफेड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्जमाफी व राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

ही घोषणा झाल्यापासून या दोन्ही घटकांसाठी सरकार काय देणार याची प्रतीक्षा होती.त्याप्रमाणे सरकारने ही घोषणा केली व त्या घटकांना यामध्ये समाविष्ट करून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा शेतकऱ्यांची नव्याने यादी बनविण्याचे काम सूरु होणार आहे. अजुनही राष्ट्रीयकृत बँकाकडून नियमित कर्जदार व दोन लाखाच्यावरील कर्जदाराची संख्या सहकार विभागास दिलेली नाही. त्यामुळे नेमकी किती रक्कम जिल्ह्याला मिळणार हे स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे.

अनेकवेळा सुचना देऊनही बँकाकडून माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ७७७ कोटीचा लाभ दोन लाखापर्यंतच्या योजनेमध्ये जिल्ह्याला होणार आहे. तर यामध्ये दोन घटकांचा समावेश केल्यानंतर हा आकडा अजून वाढणार आहे. त्यामुळे मोठा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT