file photo 
मराठवाडा

विलगीकरणासाठी शाळा पडताहेत अपुऱ्या, ११९ इमारती अधिग्रहित

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : परराज्यासह परजिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व मंगल कार्यालयाच्या ११९ इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी रविवारी (ता. २४) दिले आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर देशात लॉकडाउन करण्यात आले. नोकरी, व्यवसायानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याबाहेर गेलेले नागरिक आता मूळ गावी परत येत आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परजिल्ह्यातून येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे.

सध्या ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांची कोरोना सहायता कक्षात नोंद करीत त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर गावातील शाळांमध्ये त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र अनेक गावांत येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेच्या वर्गखोल्या अपुऱ्या ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी इमारतींचे अधिग्रहण करून मिळावे, अशी विनंती तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या इमारतींचे अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी रविवारी दिले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालयाच्या ११९ इमारतींचे अधिग्रहण करावे, असे आदेशात नमूद आहे.

यामध्ये सर्वाधिक ४६ इमारती उमरगा तालुक्यातील आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील १२, तुळजापूर २१, भूम आठ, परंडा पाच, कळंब चार, वाशी १०, तर लोहारा तालुक्यातील १३ इमारतींचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करून घ्यावे, जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून आवश्यकतेनुसार इमारतीचा ताबा घेण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT