jalparni
jalparni 
मराठवाडा

जलपर्णीच्या वेढ्यानंतर आली महापालिकेला जाग 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांत जलपर्णीचा विळखा पडला आहे. संपूर्ण तलावातील जैवविविधता धोक्‍यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. जलपर्णी काढण्यासाठी इच्छुकांकडून आयुक्तांनी प्रस्ताव मागविले आहेत. 

ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे गेल्या काही वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सलीम अली सरोवराचा परिसर विकसित केला होता. भव्य प्रवेशद्वार, पाथ वे, सरोवरात येणारे देशी-विदेशी पक्षी पाहण्याची मचाण तयार करण्यात आली होती. त्यानंतर येथे बोटिंगची व्यवस्था करण्याची तत्कालीन आयुक्तांनी घोषणा केली; मात्र त्यावर पक्षीमित्रांनी आक्षेप घेतला. बोटिंग व येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे सरोवरातील जैवविविधता नष्ट होईल, पक्षांना त्रास होईल असा आक्षेप घेत त्यांनी न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, महापालिकेने पक्षीमित्रांची समजूत काढून सरोवर सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचे वारंवार प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या सरोवराची वाताहत झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असून, तिने संपूर्ण सरोवर व्यापून टाकले आहे. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तलावाच्या सफाईसाठी कामाचा अनुभव असणाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. 

15 मार्चपर्यंत मुदत 
सरोवरात 16 प्रकारच्या वृक्षजाती, 18 प्रकारची झुडपे, आठ प्रकारच्या वेली, 32 प्रकारच्या वनस्पती, 12 प्रकारचे पाणथळ आहेत. जलपर्णी काढताना सरोवरातील या जैवसंपदेला धोका होणार नाही, याची काळजी संस्थेला घ्यावी लागणार आहे. 15 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT