Nanded News 
मराठवाडा

वर्तमानपत्रामुळेच रुंदावतात ज्ञानाच्या कक्षा

प्रमोद चौधरी

नांदेड : सध्या मला वाटते की, जैविक युद्ध सुरू झाले आहे. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आहे ‘कोरोना’. या बाबत समाजामध्ये अनेक समज, गैरसमज आहेत. अनेक वृत्त वाहिन्यांवर माहिती प्रसारित करण्यात येत आहे; पण त्यावरही शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक व्हिडिओ एडिट करून दाखवत आहेत, असा पण आरोप करण्यात येत आहे. मग सत्य काय आहे हे सामान्य माणसाला समजले पाहिजे. आणि ते काम वर्तमानपत्र करते.

वर्तमानपत्राची भूमिका महत्त्वाची 
सत्य परिस्थिती लक्षात आणून देण्याचे काम घराघरांत पोचविण्याचे काम वर्तमानपत्र करत असते. विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक देखील वर्तमानपत्रच करतात. समाजात जाणीव जागृती निर्माण झाली की समाजाचे बदलते रूप पाहायला मिळते. या माध्यमातून चांगल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या जातात. वाईटावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आज या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्याचे काम हे वर्तमानपत्रच करीत आहेत. 

वर्तमानपत्र आहे सत्यपणामुळे विश्‍वासपात्र
लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांना सामाजिक, आर्थिक, शेतीविषयक, शैक्षणिक, साहित्य, चित्रपट, नाटक, आरोग्यविषयक शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मिळत असते. म्हणून वर्तमानपत्र घराघरापर्यंत जाऊन पोचले आहे. त्यामुळे याचा एक वाचक वर्ग निर्माण झाला आहे आणि यातील सत्यपणामुळे ते विश्वासपात्र ठरले आहेत. वर्तमानपत्रांमुळे आज वाचन संस्कृती टिकून आहे.

जगाच्या घडामोडी कळतात
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्या आसपासच्या घटना घडामोडींसह जगात काय चालले आहे याची सचित्र माहिती समजते. मात्र, वर्तमानपत्रातून सर्वच घटना-घडामोडींच्या बातम्या सविस्तर दिल्या जातात. घटना-घडामोडींच्याच नाहीतर विशेष अभ्यासपूर्ण लेख, शालेय अभ्यासासोबतच विविध स्पर्धापरीक्षांविषयीचीही इत्थंभूत माहिती ही वर्तमानपत्रातूनच वाचायला भेटते. अर्थातच वर्तमानपत्रामुळे ज्ञानात मोठी भर पडते. त्यामुळे प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचायलाच पाहिजे. नव्हे ती काळाची गरज आहे.

ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात
संपादकीयमध्ये आलेला अग्रलेख अनेक जण वाचत असतात. त्याद्वारे अनेक गोष्टी लक्षात येत असतात. यामुळे वैचारिक पातळीत वाढ होते, हे मान्यच करावे लागेल. अनेक वेळा म्हटले जाते की, सकाळचे वर्तमानपत्र दुपारी शिळे होते. पण मी असे म्हणणार नाही. कारण ज्ञान वाढविण्यासाठी ते केव्हाही उपयोगी पडते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात.
- प्रलोभ कुलकर्णी, उपक्रमशील शिक्षक, नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT