नांदेड : कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले असतांना राज्यातील लाखो वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र पोहचवण्याचे कार्य अत्यावश्यक सेवा म्हणून जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांना कोरोनाच्या काळात विमा कवच मिळावे यासाठी राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी सोमवारी (ता. १३) राज्याचे बांधकाम तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील निवासस्थानी भेट घेऊन मागणी केली आहे. यावेळी निवेदन व कल्याणकारी मंडळाचा अहवालही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने देण्यात आला. यावेळी सोबत जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ पत्रकार संतोष पांडागळे होते.
अनेक अडचणींचा सामना
बालाजी पवार यांनी राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची व्यथा मांडली. सकाळी वृत्तपत्र विक्रेते चार वाजता रस्त्यावर येवून वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचे काम करतात. वृत्तपत्र विक्रेते मनात भिती व अनेक अडचणींना तोंड देत काम करत आहेत. वेळ प्रसंगी पोलिसांचा मार व धमक्यांनाही वृत्तपत्र विक्रेत्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्व देश थांबला तरी वृत्तपत्र विक्रेता अत्यावश्यक सेवा देण्यासाठी काम करत आहे.
हेही वाचा.....पिकांची काढणी केली पण खरेदीदार मिळेनात, कुठे ते वाचा...
मुख्यमत्र्यांकडे पत्रव्यवहार
वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच मिळावे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र दिले आहे. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. त्यामध्ये हे पत्र संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे असे लिहीले आहे. आपण राज्यातील तीन लाखांच्या आसपास असंघटीत कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोनाच्या काळात विमा कवच देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच विमा कवच मिळवून द्यावे, अशी मागणी यावेळी बालाजी पवार यांनी केली.
हेही वाचलेच पाहिजे.....नांदेडची अभिनव चित्रशाळा आहे लय भारी, कशी? ते वाचाच
विमासाठी मदतीचे आश्वासान
अशोक चव्हाण यांनी सर्व विषय समजून घेतले. या विषयी मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर विमा कवच देण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी प्रयत्न करु, असे श्री. चव्हाण यावेळी सांगीतले. वृत्तपत्र विक्रेता हा छपाई माध्यमातील महत्वाचा घटक आहे. विमा कंपन्यांकडून माहिती घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिवाचा विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच मी आपल्यासोबत आहे काही काळजी करू नका असेही ते यावेळी श्री चव्हाण म्हणाले. देश कोरोनाच्या लढाईत उतरला असतांना आपले वृत्तपत्र विक्रेतेही अत्यावश्यक सेवा देऊन महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याची व त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी संबंधित विभाग, विमा कंपन्या सोबत चर्चा करून आपल्या हक्काच्या मागणीसाठी प्रयत्न करणार असे ते म्हणाल्याचे बालाजी चव्हाण यांनी सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.