संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये नो मार्किंग, नो पार्किंग : नियमापेक्षा दंडावर भर

मनोज साखरे

औरंगाबाद - खरेदीसाठी बाजारपेठेत जा, की रुग्णालयाजवळ दुचाकी लावा, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी. माणसांच्या संख्येपाठोपाठ वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने पार्किंगच्या अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून हीच वाहने टोइंग वाहनामुळे उचलले जात असल्याने नागरिकांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात पार्किंगचा प्रश्‍न कायम आहे. पार्किंग-नो पार्किंग झोनचा पत्ता नाही, रस्त्यावर येलो मार्किंग नाही. परिणामी, वाहन उचलेगिरीलाही संधी प्राप्त झाली आली. 

औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज बाजारपेठ असो, की टीव्ही सेंटर, सिडकोतील मोक्‍याची जागा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी बॅरिकेड्‌स लावून पोलिस त्यांच्या पातळीवर उपायही करीत आहेत; परंतु वाहनांची संख्या एवढी वाढली, की पार्किंगसाठी असलेली जागा भरली, की त्याच्या बाजूला लागणारे वाहन उचललेच म्हणून समजा. पार्किंगचा प्रश्‍नच एवढा गंभीर आहे, की वाहनधारकांना त्यांचे वाहन कोठे लावावे हा प्रश्‍न आहे. रस्त्याच्या कडेला डांबरी रस्त्यांच्या खाली दूरपर्यंत अडथळा नसलेली वाहनेही उचलण्याचे काम वाहतूक पोलिसांकडे कामाला असलेल्या तरुणांकडून होते. विशेषत: वाहन उचलल्यानंतर अशी कारवाई केल्याचे त्या जागी कोणतीही माहिती, खूण ठेवली जात नाही. परिणामी, वाहनधारकांना वाहन चोरी झाल्याची शक्‍यताच अधिक वाटते. मग त्यांची धावाधाव सुरू होते. कुटुंबातील सदस्यांना तिथेच सोडून किंवा रिक्षाने घरी पाठवून वाहन मिळवण्यासाठी पोलिस ठाण्याकडे धाव घेण्याची वेळ अनेकांवर येत आहे. बाजारपेठेत गर्दीमुळे रस्त्याच्या कडेला वाहनांचीही झालेली गर्दी वाहन उचलणाऱ्या वाहतूक विभागासाठी संधी ठरत आहे. 
 
पार्किंग सुविधाच नाही 
 

  • शहरातील सुमार वाहतूक व्यवस्था व पार्किंगचा प्रश्‍न गहन आहे. 
  • विविध भागांतील मुख्य बाजारपेठेत वाहनतळाची व्यवस्थाच नाही. 
  • बाजारपेठेलगत वाहनतळाचेही नियोजन नाही. 
  • तात्पुरती व्यवस्थाही अनेकदा कोलमडते. 
  • सणासुदीत वाहनांच्या गर्दीमुळे वाहनधारकांची तारांबळ वाढते. 
  • वाहने लावायची कोठे हा प्रश्‍न कायमचाच. 

 या उपायांची गरज  

  • नागरिकांसाठी वाहतूक पोलिसांनी पार्किंगच्या जागा ठरवून द्याव्यात. 
  • रस्त्यावर येलो मार्किंग करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT