Dhangar Reservation
Dhangar Reservation sakal
मराठवाडा

Dhangar Reservation : आरक्षण नाही तो पर्यंत मतदान नाही, धनगर समाजाचा निर्धार

प्रशांत शेटे

चाकूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्षाला मतदान करायचे नाही असा फलक धनगर समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या घराच्या समोर लावण्यात येणार असल्याचा निर्धार सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी) आरक्षणाची अमलबजावणी करावी या मागणीसाठी बुधवारी (ता.११) लातूर - नांदेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करून सरकारवर रोष व्यक्त केला. धनगर समाजाच्या वतीने वेळोवळी आंदोलन केले जात आहे परंतू अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले जात नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे.

आजपर्यंत सर्वच पक्षाच्या राज्य सरकारने धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ केली आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तेथील राज्य सरकारने केलेली आहे, राज्यातील भाजपच्या सरकारने निवडणुकीपुर्वी आरक्षण देण्याची घोषणा केली परंतू त्यांच्याकडून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली नाही.

धनगर समाजाला अनुसुचित जातीचे तातडीने आरक्षण जाहीर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी सभापती अँड. माधवराव कोळगावे, माजी सरपंच गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, सुरेश हाके, सुरेश शेवाळे, अशोक करडीले, हणमंत शेळके, सुदर्शन येमे, लहुजी कोरे, गुणवंत केसाळे, नामदेव मांडरुके, संतोष गडदे, सतीष गाडेकर, नारायण काचे आदी सहभागी झाले होते.

आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही

सर्व राजकीय पक्षांकडून धनगर समाजाला मतदानासाठी वापर करून घेतला जात आहे, अनेक वर्षापासून आरक्षणाचा विषय प्रलंबीत आहे याचा जाब खासदार, आमदारांना विचारला जाणार आहे. आरक्षण मिळत नाही तो पर्यंत धनगर समाज येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करणार नसल्याचा निर्धार करण्यात आला असून याबाबतचे फलक प्रत्येकाच्या घरासमोर लावले जाणार आहेत.

अॅड. माधवराव कोळगावे, संयोजक तथा माजी सभापती पंचायत समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT