file photo
file photo 
मराठवाडा

साहित्य खरेदीचा आता नळधारकांना अधिकार

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापालिका नवीन वितरण व्यवस्थेवर नळजोडणीसाठी फक्त अनामत रक्कम, रस्ता दुरुस्ती व पाइपलाइनवर ड्रील करण्याचे शुल्क घेणार आहे. नळधारकांना दर्जेदार वॉटर मीटरसह साहित्य स्वतःच खरेदी करावे लागेल. ज्यांनी अनामत रक्कम भरली, त्यास नळजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोमवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.
परभणी महापालिकेने नळजोडणीसाठी निश्चित केलेल्या दराला काही नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला होता. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महापालिकेच्या शिष्टमंडळाला काही सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. वरपुडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. वरपुडकर म्हणाले की, ‘‘यूआयडीएसएसएमटी योजना काही कारणांनी रखडली होती. परंतु, अमृत योजनेनंतर या योजनेला गती मिळाली व राज्यात अमृत योजना पूर्ण करणारी परभणी महापालिका पहिली ठरली आहे. त्यामुळे योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेत नागरिकांना १३५ लिटर पाणी दिले जाणार असून त्यानंतर भूमिगत गटार योजनादेखील मिळू शकते. त्यासाठीचा शासनाकडे ४२७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.’’
या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी ऊर्फ माजुलाला, रवींद्र सोनकांबळे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, माजी स्थायी समिती सभापती सुनील देशमुख, शिवसेनेचे गटनेते चंद्रकांत शिंदे, नागेश सोनपसारे, इम्रान हुसेनी, विनोद कदम, अमोल जाधव, शहर अभियंता वसीमखान पठाण आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा व पहा- Video: वैद्यकीय प्रवेशाचा ७०-३० फार्म्युला रद्द करा; संभाजी सेनेचे धरणे


असे असतील नवे दर...
नळजोडणी दराबाबत श्री. वरपुडकर म्हणाले, ‘‘अनामत रक्कम चार हजारांवरून दोन हजार करण्यात आली आहे. कच्चा रस्ता फोडण्यासाठी एक हजार २०० रुपये, तर पक्का रस्ता फोडवा लागल्यास त्यास दीड हजार रुपये शुल्क लावले जाणार आहे. या व्यतिरीक्त पाइपलाइनवर ड्रील करण्यासाठी २०० रुपये दर लागले. या व्यतिरिक्त महापालिका कुठलेही शुल्क घेणार नाही. वॉटर मीटर अनिवार्य आहे. त्यासह अन्य साहित्य स्टॅंडर्ड कंपन्यांचे नळधारकांना घ्यावे लागेल. देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढू नये म्हणून साहित्य हे गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. जर मीटर बसविले नाही तर पाइपलाइनमध्ये सोडलेल्या पाण्यानुसार दर लावले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे राहटी पासून येणारी अडीच किलोमीटर अंतराची पाइपलाइन क्षतिग्रस्त होणार आहे. त्यासाठी शासनाकडे दहा कोटींची मागणी केली आहे.’’


३० नळजोडणीधारकांची नियुक्ती
शहरातील नळजोडण्या जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ३० प्लंबर नियुक्त केले जाणार आहेत. थकीत पाणीपट्टी भरल्याशिवाय नवीन नळजोडणी दिली जाणार नाही. अनधिकृत नळ घेणाऱ्यांना ते अधिकृत करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अनधिकृत नळजोडण्या आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारादेखील श्री. वरपुडकर यांनी दिला आहे.


सकारात्मक निर्णयाचा मनस्वी आनंद
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दखल घेऊन महापालिकेला दिलेल्या सूचना व आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे व आयुक्त रमेश पवार यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचा मनस्वी आनंद आहे. याबद्दल त्या सर्वांचे आभार.
 - सचिन देशमुख, नगरसेवक, महापालिका, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT