khanij 
मराठवाडा

अबब... ‘या’ जिल्ह्यात आठ ट्रकमध्ये आढळले अवैध गौण खनिज

सकाळ वृत्तसेवा

वसमत ः वसमत तालुक्‍यातील अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांवर तहसिलच्या पथकाने कारवाई करून त्‍यांच्याकडून १५ लाख २४ हजार ८०० रुपयांचा दंड शुक्रवारी (ता. २०) ठोठावला आहे.
वसमत तालुक्यामध्ये (ता. १४ ते १९) डिसेंबर दरम्यान, स्थापन केलेल्या गौण खनिज पथकाकडून दिवस व रात्र गस्त करीत असताना आढळून आलेल्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या दरम्यान, अनधिकृत गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने सदरील वाहन जप्त करून चौकशीअंती दंडाच्या रकमेचा आदेश संबंधित वाहनमालकावर बजावण्यात आला आहे.

अशी आहेत आढळलेली वाहने 
गौण अनधिकृत खनिज वाहतूक करताना आढळून आलेल्या वाहनांचा तपशील पुढीलप्रमाणे.
छोटूलाल कौल यांचे टिप्पर (क्रमांक एचएच २० ईजी ४७८१), गौण खनिज मुरूम ः दंडाची रक्कम ः दोन लाख २७ हजार ७५०, शिवशंकर गुजांळ यांचे टिप्पर (क्रमांक एमएच २० ईजी ४७८३) गौण खनिज मुरूम ः दंडाची रक्‍कम ः दोन लाख २७ हजार ७५० रुपये, जनार्धन जाधव यांचे टिप्पर ( क्रमांक एचएच २० ईजी ४७८४) गौण खनिज मुरूम ः दंडाची रक्‍कम ः दोन लाख २७ हजार ७५० रुपये. पंडित फुलझळके टॅक्‍टर (क्रमांक एमएच ३८ ६८७२) गौण खनिज वाळू ः दंडाची रक्‍कम ः एक लाख २६ हजार ७५० रुपये, व्यकंटी मोरे यांचे टिप्पर (क्रमांक एचएच २० ईजी ४७८७) गौण खनिज मुरूम ः दंडाची रक्‍कम ः दोन लाख २७ हजार ७५० रुपये. नंदकुमार निरपासे यांचे टॅक्‍टर (क्रमांक एचएच ३८ ई १४५९) गौण खनिज ढबर ः दंडाची रक्‍कम ः एक लाख सहा हजार ८०० रुपये. कैलास लांडगे यांचे टिप्पर (क्रमांक एचएच १४ बीके २९२२) गौण खनिज वाळू ः दंडाची रक्‍कम ः दोन लाख ५३ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे.

तीन वाहनमालकांकडून इतका दंड घेतला
एकूण आठ वाहनांपैकी तीन वाहनमालकांकडून नियमाप्रमाणे दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. यात छोटूलाल कौल ः दंड रक्कम ः दोन लाख २७ हजार ७५० रुपये, शिवशकर गुजांळ ः दंड दोन लाख २७ हजार ७५० रुपये, जनार्धन जाधव ः दंड दोन लाख २७ हजार ७५० रुपयांचा समावेश आहे. 


यांनी केली कारवाइ
उपविभागीय अधिकारी वसमत प्रवीण फुलारी व तहसीलदार ज्योती पवार यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सचिन जैस्वाल, बी. एम. कौठेकर, के. एन. अंभोरे, श्री. कावळे, श्री. आहेर, श्री. वाघिले, राजेश पांचाळ, श्री. शातलवार यांनी ही कारवाइ केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT